गोवंडीमधील चिखलवाडी परिसरात बांधकाम व्यवसायातील वादातून दोघांनी एका व्यक्तीवर धारधार शस्त्राने वार केले. यासंदर्भात शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

हेही वाचा >>> मुंबई : ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ची चाचणी सप्टेंबर अखेरीस ?

गोवंडी येथे राहणारे तक्रारदार मोहम्मद फारुख शेख (३७) आणि त्यांच्या वडिलांना शुक्रवारी सकाळी १०.३० च्या सुमारास दोघांनी मारहाण आणि शिवीगाळ केली. दोघांनी तक्रारदाराच्या वडिलांवर धारदार शस्त्राने वार केले. याप्रकरणी तक्रारदार शेख याने शिवाजी नगर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०७ , ४५२ , ५०६ (२), ५०४, ३४ भा.द.वि.सह कलम ३७ (१) (अ) , १३५ म.पो.का. अन्वये गुन्हा नोंद केला. दरम्यान, दोन्ही आरोपींना अटक केल्याची माहिती शिवाजी नगर पोलिसांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.