वाशी आगार ते जागतिक व्यापार केंद्रापर्यंत बस क्रमांक ‘सी-५०’ आणि शिवाजी नगर ते मंत्रालयापर्यंत बस क्रमांक ‘सी-८’ या दोन जलद बस शनिवारपासून पूर्व मुक्त मार्गावरुन सुरू करण्यात आल्या. वाशी आगार येथून सकाळी ८.३० आणि ९ वाजता, तर मंत्रालय येथून सायंकाळी ५.३० आणि ६ वाजता परतीच्या प्रवासासाठी या बस उपलब्ध होतील. मात्र ही बस सेवा सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी बंद ठेवण्यात येणार आहे. स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांच्या हस्ते या बस शनिवारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी एम-पूर्व प्रभाग समितीचे अध्यक्ष अरुण कांबळे, नगरसेवक विठ्ठल खरटमोल, नगरसेविका उषा कांबळे आदी उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Jul 2013 रोजी प्रकाशित
पूर्व मुक्त मर्गावरुन बेस्टची बस सेवा
वाशी आगार ते जागतिक व्यापार केंद्रापर्यंत बस क्रमांक ‘सी-५०’ आणि शिवाजी नगर ते मंत्रालयापर्यंत बस क्रमांक ‘सी-८’ या दोन जलद बस शनिवारपासून पूर्व मुक्त मार्गावरुन सुरू करण्यात आल्या.
First published on: 02-07-2013 at 02:54 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Best transport starting bus service on free expressway