२०१९ साली शिवसेना – भाजपाने एकत्र निवडणूक लढवल्या होत्या. राज्यातील जनतेने या युतीलाच कौल दिला होता. सेना-भाजपा एकत्र सत्ता स्थापन करावी अशीच लोकांची भावना होती. मात्र, त्यानंतरही आपण असंगाशी संग करत काँग्रेस राष्ट्रवादीशी धरोबा केला. लोकभावनेला पायदळी तुडवत असताना तेव्हा आपल्याला लाज वाटली नव्हती का?, असा सवाल शिंदे गटाकडून प्रतोद म्हणून नेमणूक केलेल्या भरत गोगावले यांनी विचारला आहे.

नक्की वाचा >> २०० आमदार निवडून आणण्याच्या मुख्यमंत्री शिंदेंच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणाले, “मला वाटतं त्यांचं चुकलं काहीतरी, आपली…”

पुढे बोलताना गोगावले यांनी, “आम्ही बाळासाहेबांचा हिंदूत्ववादी विचार लोकभावनेचा आदर करत सेना भाजपा युतीचे सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे आम्हाला ना त्याची लाज बाळगण्याची गरज आहे ना राजीनामा देण्याची,” असेही म्हटले आहे. दहिसर येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यांमध्ये आदित्य ठाकरे यांनी भाषण करताना शिंदे गटातील आमदारांवर निशाणा साधला. त्यावर गोगावले यांनी हे उत्तर दिले आहे. यापूर्वी झालेल्या चूका टाळून आता तरी असंगाशी संग सोडा, असे आवाहनही त्यांनी उद्धव ठाकरेंच्या पाठिशी असणाऱ्यांबरोबरच शिवसेनेला केलं आहे.

नक्की वाचा >> अजित पवारांचं बंड मोडण्यात तुम्हाला यश आलेलं मग उद्धव ठाकरे बंड का मोडू शकले नाहीत?; शरद पवार म्हणाले, “आमच्यात काही…”

“शिवसेनाप्रमुखांच्या तालमीत तयार झालेल्या आम्हा मावळ्यांची हिंमत काय आहे हे उभ्या जगाने पाहिले आहे. तुम्हालाही त्याची अनुभूती आली असेलच. बाळासाहेबांच्या धगधगत्या विचारांची ही हिंमत आहे. त्यामुळे कुणी आम्हाला आव्हान देऊ नये. त्याचे चटके अनेकांना सहन होणार नाही,” असा अप्रत्यक्ष इशाराही गोगावलेंनी दिला आहे.

नक्की वाचा >> नागपूरमधील फडणवीसांच्या बॅनर्सवरुन अमित शाहांचे फोटो गायब; शरद पवारांना विचारलं असता म्हणाले, “त्याच्यात कोणाचा फोटो…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“शिवसेनेचे काही आमदार आजही या युतीच्या बाहेर आहेत. त्यांनी आता जनाची नाही तर मनाची लाज बाळगत काँग्रेस, राष्ट्रवादीची साथ सोडून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दाखविलेल्या हिंदूत्वाची पुन्हा एकदा कास धरावी,” असे आवाहनही गोगावलेंनी केले. “सुबह का भूला शाम को धर लौटा तो उसे भूला नही केहेते,” असेही गोगावले यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले आहे.