अत्यंत दाटीवाटीने वसलेल्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींमुळे सतत चर्चेत असलेल्या भेंडीबाजार येथील साडेसोळा एकर जागेचा पुनर्विकास करण्यासाठी महानगरपालिकेने आयओडी दिले आहे. यानंतर सीसीसाठी अर्ज केला जाणार असून बांधकाम सुरू होण्यासाठी आणखी काही महिने लागतील. मात्र यादिशेने पाऊल पडल्याने अनेक नागरिकांचा जीव भांडय़ात पडला आहे.
पुनर्विकासासाठी इंडिमेशन ऑप डिसअ‍ॅप्रूव्हल (आयओडी) ही परवानगी आवश्यक असते. पुनर्विकास करत असलेल्या, सैफी बर्हानी अपलिफ्टमेंट ट्रस्टने सुमारे या भागातील ८५ टक्के इमारती ताब्यात घेतल्या आहेत.भेंडीबाझारमधील प्रस्तावित जागेचा पुनर्विकास केल्यानंतर येथे ३२०० घरे, २५० इमारती आणि १२५० व्यवसायांसाठी जागा उपलब्ध होईल.