मुंबई : अंधेरी, लोखंडवाला परिसरात दुचाकीला मोटरगाडीने दिलेल्या धडकेत २९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ओशिवरा येथील लोट्स पेट्रोल पंप येथे हा अपघात झाला. उमाशंकर रोहिणी प्रसाद शुक्ला असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तो डिलेव्हरी एजंट म्हणून काम करायचा. तो मूळचा मध्य प्रदेशचा रहिवासी होता.

हेही वाचा – मुंबईत एक कोटी मतदार, सर्वाधिक मतदार चांदिवलीत, तर सर्वात कमी मतदार वडाळ्यात

हेही वाचा – दुसऱ्या दिवशीही पथकराचा गोंधळ कायम, फास्टॅगमधून पैसे कापल्याचे संदेश, मार्गिकांच्या गोंधळामुळे वाहतूक कोंडी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मंगळवारी लोटस पेट्रोल पंपाजवळ शुक्लाच्या दुचाकीला मागून एक मोटरगाडीने धडक दिली. त्यामुळे तो खाली पडला आणि त्याचे डोके मोटरगाडीच्या मागच्या चाकाखाली आले. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. चालकाने काही अंतरावर मोटरगाडी थांबवली. त्यानंतर तो परत आला व त्याने जखमी शुक्लाला रिक्षात बसवले व कूपर रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी मोटरगाडी चालक सौरभ सोलंकी (४२) विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.