कुर्ला येथील एल.बी.एस. रोडवर टेम्पोने दुचाकीला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला, तर दुचाकीवर पाठीमागे बसलेला तरूण जखमी झाला. याप्रकरणी कुर्ला पोलिसांनी गुन्हा दाखल करून टेम्पो चालकाला अटक केली आहे.

हेही वाचा >>>मुंबई: नायर दंत रुग्णालयात लवकरच अद्ययावत सुविधा; नवी इमारतीमधील कारभार महिनाभरात होणार सुरू होणार

तौफीक राहत अली शेख (१८) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. शेख आणि त्याचा मित्र साहिल शाहबाज अली अन्सारी (१८) एल.बी.एस. मार्गावरून दुचाकीने जात होते. कुर्ला येथील मनोहर कंपाऊंड येथे त्यांच्या दुचाकीला टेम्पोने धडक दिली. त्यात शेख गंभीर जखमी झाला. शेखला जवळच्या रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

हेही वाचा >>>मुंबई: मुलुंडमध्ये घराची भिंत कोसळून एक महिला ठार, एक जखमी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुचाकीस्वार शीव येथील सोशल नगर येथील रहिवासी आहे. तो दुचाकीवरून कुर्ल्याला जात असताना हा अपघात झाला. त्यात अन्सारीही जखमी झाला. याप्रकरणी अन्सारीच्या तक्रारीवरून कुर्ला पोलिसांनी टेम्पो चालकाला अटक केली. त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले असून ते तपासणीसाठी न्यायवैधक प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.