माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा उल्लेख ‘मोगॅम्बो’ असा केला होता. त्यानंतर सोमवारी पुन्हा त्यांनी ‘मोगॅम्बो’ म्हणत अमित शाहांवर निशाणा साधला. मोगॅम्बोच्या अनेक पिढी उतरल्या तरीही शिवसेना संपणार नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी टीकास्त्र सोडलं. दरम्यान, या टीकेला आता भाजपा नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – “आमची लढाई चोर, डाकू अन् त्यांच्या…”; सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीपूर्वी संजय राऊतांचं शिंदे गटावर टीकास्र!

Ashish patil shared experience of those who perform lavni and dance in women's clothes sometimes being raped
स्त्री पात्र निभावणाऱ्या पुरुषांना वेगळ्या नजरेने पाहिलं जातं; ‘लावणीकिंग’ आशिष पाटीलने सांगितला अनुभव, म्हणाला, “काहीजणांवर बलात्कार…”
Navneet Rana Answer to Sanjay Raut
‘नाची’, ‘डान्सर’, बबली म्हणणाऱ्या संजय राऊतांना नवनीत राणांचं जशास तसं उत्तर, म्हणाल्या, “मला बोलण्याआधी..”
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
supriya sule, ajit pawar, sunetra pawar
“दुसऱ्यांच्या घरात मी कशाला डोकावू?”, असं का म्हणाल्या सुप्रिया सुळे

काय म्हणाले आशिष शेलार?

“उद्धव ठाकरेंची मनस्थिती, त्यांचा थयथयाट, तळतळाट, त्रागा, नैराश्य, वैफल्य यासर्व गोष्टी आम्ही समजू शकतो. राजकारण करताना आम्ही कधीच टीकेला घाबरत नाही. पण राजकारणाचे काही संकेत असतात, त्या संकेताप्रमाणे टीका करताना संयम आणि मर्यादा पाळण्याची आवश्यकता असते”, अशी प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी दिली.

हेही वाचा – दिल्लीमधील कथित उत्पादन शुल्क घोटाळ्याचे धागेदोरे महाराष्ट्रापर्यंत? आशिष शेलारांचं ट्वीट चर्चेत!

“…हे उद्धव ठाकरेंनी लक्षात ठेवावं”

“केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आमचा अभिमान आणि स्वाभिमान आहेत. त्यांच्यावर अशा पद्धतीने खालच्या पातळीवरची टीका आम्ही सहन करणार नाही. अन्यथा आम्हालाही मर्यादा सोडाव्या लागतील. मी कोकणी माणूस आहे, हे उद्धव ठाकरेंनी लक्षात ठेवावं. आमच्याकडे त्यापेक्षा वाईट शब्द आहेत”, असा इशाराही त्यांनी दिला.

हेही वाचा – “एकनाथ शिंदेंचा सपशेल गौतमभाई अदानीच झालाय”, ठाकरे गटाचा मुख्यमंत्र्यांना टोला; म्हणे, “असे ‘मोदीछाप’ विधान…!”

“उद्धव ठाकरे हिंदी चित्रपटातील असराणी”

“उद्धव ठाकरे हिंदी चित्रपटातील असराणी सारखे झाले आहेत. शोले चित्रपटात जसे असराणी म्हणतात, ”आधे इधर जावो, आधे उधर जावो” तशी उद्धव ठाकरेंची अवस्था झाली आहे, अशी मांडणी आम्ही करू शकतो. याची सुरुवात तुम्ही केली. मात्र याचा शेवट आम्ही करू. अमित शाहांवर अशाप्रकारची टीका आम्ही सहन करणार नाही”, असेही ते म्हणाले.