केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन सुशांत सिंहची मॅनेजर दिशा सॅलियनच्या मृत्यूसंबंधी बोलताना काही गंभीर आरोप केले होते. दिशा सॅलियनची हत्या करण्यात आली असून हत्येआधी बलात्कार करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला होता. यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना पत्र लिहिलं असून आयोगाने पोलिसांनी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यादरम्यान भाजपा आमदार नितेश राणे यांनी आता काही ट्वीट करुन सचिन वाझेचा सहभाग होता का असा प्रश्न उपस्थित केला आहे.

नितेश राणेंनी ट्वीटमध्ये काय म्हटलं आहे –

“मालवणी पोलिसांची भूमिका पहिल्या दिवसापासूनच संशयास्पद राहिली आहे. आणि आता त्यांना दिशा सॅलियन प्रकरणात अहवाल सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे. दिशासोबत राहणारा आणि ८ तारखेच्या रात्री उपस्थित असणाऱा रोहित राय पुढे येऊन काहीच का बोलत नाही?,” असा सवाल नितेश राणेंना विचारला आहे.

narendra modi
धर्माच्या आधारावर आरक्षणाचा प्रयत्न! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर आरोप
A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
rape case in Gaziayabad
प्रियकराने केलेला बलात्कार लपवण्यासाठी आई करायची १० वर्षांच्या मुलीचा छळ, वेश्या व्यवसायात ढकलण्याचाही प्रयत्न
police case marathi news, prithvi shaw marathi news
‘पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश द्या’, पृथ्वी शॉविरोधात गुन्हा न नोंदवल्याचे प्रकरण

दिशा सालियन मृत्यू प्रकरण : नारायण राणेंना आरोप भोवणार?; महिला आयोगाने पोलिसांना दिले आदेश

“मुंबईच्या महापौरांनी महिला आयोग आणि त्यानंतर मालवणी पोलिसांना पत्र लिहून अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे. याचा अर्थ राज्य सरकारकडून ८ जूनच्या रात्री काहीच झालं नाही अंस दाखवण्यासाठी मोठी तयारी सुरु आहे. चला किमान ते आपली कबर खोदत आहेत याचा आनंद आहे,” असं नितेश राणे म्हणाले आहेत.

“दिशाला ८ तारखेच्या रात्री काळ्या मर्सिडीजमधून तिच्या मालाडच्या घरी नेण्यात आलं. सचिन वाझेकडेही काळी मर्सिडीज आहे जी सध्या तपास यंत्रणांकडे आहे. ही तीच कार आहे का? ९ जूनला त्याला पुन्हा पोलीस खात्यात रुजू करण्यात आलं. संबंध?,” अशी शंका नितेश राणेंनी उपस्थित केली आहे.

“मालवणी पोलिसांनी योग्य तपास न केल्याने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं होतं. बरोबर ना? आणि आता याच पोलिसांना महिला आयोगाने अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे? हे किती योग्य आहे? नेमकं कोणाला वाचवण्याचा प्रयत्न सुरु आहे?,” अशी विचारणा नितेश राणेंनी केली आहे.

काय म्हणाले होते नारायण राणे?

काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी खासदार विनायक राऊत यांना इशारा दिला होता. “खासदार विनायक राऊत यांच्यासाठी खास बातमी लवकरच सुशांतसिंग व सामुदायिक बलात्कार करून तिची हत्या केली त्या दिशा सालियन या दोघांचीही आत्महत्या नव्हे हत्या झाली त्यांचीही चौकशी परत होईल एवढेच नाही तर मातोश्रीच्या चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचे कळाले. विनायक राऊत हे घडल्यावर आपले “बॉस” आणि आपण कुठे धावणार?,” असे राणेंनी म्हटले होते.

बलात्कार होत असताना बाहेर पोलीस सुरक्षा कुणाची होती – नारायण राणे

“आमच्याकडेही काही कागदपत्र आहेत. महाराष्ट्रात काही घटना घडल्या. ८ जूनला दिशा सालियानची बलात्कार करून हत्या केली. सांगितलं गेलं आत्महत्या केली. एक तर ती त्या पार्टीला जात नव्हती. तिला जबरदस्तीनं बोलावलं. तिचा मित्र रोहन राय यानं. त्यानंतर तिला थांबायला सांगितलं, ती थांबली नाही. ती घरी निघाली. त्यानंतर कोण कोण होते, पोलीस सुरक्षा कुणाला होतं, तिच्यावर बलात्कार होत असताना बाहेर पोलीस सुरक्षा कुणाची होती. तिच्या पोस्ट मॉर्टमचा अहवाल अजून बाहेर का आलेला नाही? ७ महिने झाले, अजून का बाहेर आला नाही? दिशा सालियान ज्या इमारतीत राहायची, त्या इमारतीच्या रजिस्टरची ८ जूनची पानं का नाहीत? कुणी फाडली?,” असा सवाल नारायण राणेंनी पत्रकार परिषदेमध्ये विचारला होता.

हत्या करण्यात आली तेव्हा कोणत्या मंत्र्याची गाडी होती?

“त्यानंतर दिशा सालियन, सुशांतसिंहला जेव्हा कळलं, तेव्हा तो कुठएतरी बोलला की मी यांना सोडणार नाही. मग काही लोक त्याच्या घरी गेले. घरात जाऊन बाचाबाची झाली दिशा सालियानवरून. त्या बिचाऱ्याची हत्या करण्यात आली. तेव्हा कोणत्या मंत्र्याची गाडी होती? त्या बिल्डिंगचे सीसीटीव्ही गायब कसे झाले? १३ जूनला रात्री सीसीटीव्हीचे कॅमेरे नव्हते. आधी होते असं सोसायटीतले लोक सांगतात. ठराविक माणसाची अँब्युलन्स कशी आली? ती कुणी आणली? रुग्णालयात कुणी नेलं? पुरावे नष्ट कुणी केले? याची चौकशी होणार. त्यात कोणते अधिकारी होते, तेही आता तिथे राहिलेले नाहीत. तेही आता सगळं उघडं करतील,” असेही नारायण राणे म्हणाले होते.

रुपाली चाकणकर यांनी काय सांगितलं आहे?

“मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचा तक्रार अर्ज महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयास प्राप्त झाला आहे. श्रीमती दिशा सॅलियन या सुशांतसिंग राजपूत यांच्या पूर्व व्यवस्थापक होत्या. तिच्या मृत्यूबाबत सीबीआय यंत्रणेमार्फत तपास करण्यात आला आहे. मृत्यूपूर्वी तिच्यावर बलात्कार झाला नसून त्यावेळेस ती गरोदर देखील नव्हती, असे तिच्या शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यास तिच्या आईवडिलांनी देखील दुजोरा दिला आहे. असे असतानाही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिशा सॅलियन हिची बलात्कार करून हत्या झाल्याचा आरोप केला आहे. ही बाब अतिशय दुर्दैवी व वेदनादायक आहे. त्यामुळे मृत्यूनंतरही दिशा सॅलियन यांची बदनामी करणाऱ्याविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी महापौर किशोरी पेडणेकर यांनी महाराष्ट्र राज्य महिला आगोगाकडे केली आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मालवणी पोलीस स्टेशन यांना ४८ तासांमध्ये याचा अहवाल सादर करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून देण्यात आले आहेत,” असं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितलं होतं.