“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अन्वय नाईक परिवाराशी आर्थिक व व्यावसायिक संबंध होते, आहेत. ते का लवण्यात आले. रश्मी उद्धव ठाकरे, मनिषा रवींद्र वायकर यांनी रायगड जिल्ह्यातील कोलेई (ता. मुरूड) येथे अन्वय मधुकर नाईक, अक्षदा अन्वय नाईक यांच्याकडून जमिनी घेतल्या. उद्धव ठाकरे, तुम्ही यासाठी अर्णब गोस्वामींना लक्ष्य करत आहात का?,” असा गंभीर आरोप भाजपा नेते किरी सोमय्या यांनी ठाकरे कुटुबांवर केला होता. दरम्यान, यावरुन आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनीदेखील भाजपावर गंभीर आरोप केले आहेत.
“दिवंगत अन्वय नाईक आत्महत्येसाठी जबाबदार व्यक्तीला पाठीशी घालण्याच्या प्रयत्नात किरीट सोमय्या यांनी त्यांच्या जमीन व्यवहारामध्ये आणून आपली व भाजपाची हीन मानसिकता दर्शवली. रिपब्लिक चॅनेलमध्ये भाजपा खासदार राजीव चंद्रशेखर हे भागीदार होते. गोस्वामी यांचा भाजपाशी थेट संबंध आहे,” असा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून भाजपावर निशाणा साधला.
आणखी वाचा- ठाकरे कुटुंबासोबत केलेल्या जमीन व्यवहारावर अन्वय नाईक कुटुंबीयांनी केला खुलासा; म्हणाले…
दिवंगत अन्वय नाईक आत्महत्येसाठी जबाबदार व्यक्तीला पाठीशी घालण्याच्या प्रयत्नात किरीट सोमय्या यांनी त्यांच्या जमीन व्यवहाराला मध्ये आणून आपली व भाजपाची हीन मानसिकता दर्शवली. रिपब्लिक चॅनेलमध्ये भाजपा खासदार राजीव चंद्रशेखर हे भागीदार होते. गोस्वामी यांचा भाजपाशी थेट संबंध आहे
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) November 13, 2020
अन्वय नाईक यांच्या आत्महत्येचा व जमीन व्यवहाराचा संबंध काय? मराठी कुटुंबाची वाताहत झाली त्याचे सोमय्या यांना काहीही पडले नाही. फडणवीस सरकारने आत्महत्या प्रकरण दाबले कारण आरोपी भाजपा संबंधित आहे. भाजपासाठी काम करतो. भाजपा हा पक्ष महाराष्ट्र द्वेष्टा आहे हे स्पष्ट आहे.
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) November 13, 2020
आणखी वाचा- उद्धव ठाकरेंनी शपथविधीनंतर ३४५ कोटी बिल्डरला गिफ्ट दिले; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप
“अन्वय नाईक यांच्या आत्महत्येचा व जमीन व्यवहाराचा संबंध काय? मराठी कुटुंबाची वाताहत झाली त्याचे सोमय्या यांना काहीही पडलेलं नाही. फडणवीस सरकारने आत्महत्या प्रकरण दाबले कारण आरोपी भाजपा संबंधित आहे. भाजपासाठी काम करतो. भाजपा हा पक्ष महाराष्ट्र द्वेष्टा आहे हे स्पष्ट आहे,” असंही सावंत यांनी नमूद केलं.