भाजप नेते मोहित कंबोज यांच्या मालाडच्या कार्यालयावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली आहे. मोहित कंबोज हे मुंबई भाजपच्या उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष आहेत.
उत्तर भारतीयांचे मुंबईमध्ये तुम्ही किंवा तुमच्या कार्यकर्त्यांनी काही नुकसान केले तर त्याच्यापेक्षा दुप्पट नुकसान तुमचं करु, असं खुलेआम पत्र लिहून कंबोज यांनी राज ठाकरे यांना धमकी दिली होती. तुम्हाला प्रेमाची भाषा समजत नसेल आणि फक्त मारहाणीचीच भाषा समजत असेल, तर ईंट का जवाब पथ्थर से देंगे असेही या पत्रात कंबोज यांनी म्हटले होते. तसेच, हे पत्रक त्यांनी सोशल मिडियावरही प्रसिद्ध केले होते. त्यानंतर आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी कंबोज यांच्या कार्यालयावर दगडफेक केल्याचे समजते.
राज ठाकरे यांनी मनसेच्या दहाव्या वर्धापनदिन कार्यक्रमात बोलताना नव्या रिक्षा रस्त्यावर आल्या तर, जाळून टाका असा आदेश दिला होता. नव्या देत असलेल्या रिक्षा परवान्यांमध्ये परप्रांतीय रिक्षाचालकांचा भरणा अधिक असल्याचा त्यांनी आरोप केला होता.
संग्रहित लेख, दिनांक 13th Mar 2016 रोजी प्रकाशित
राज ठाकरेंना धमकावणा-या भाजप नेत्याच्या कार्यालयावर हल्ला
खुलेआम पत्र लिहून कंबोज यांनी राज ठाकरे यांना धमकी दिली होती.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali

First published on: 13-03-2016 at 11:54 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp worker mohit kambojs office attacked in mumbai