scorecardresearch

मुंबईत मद्यधुंद अवस्थेत कारचालकाने दिली धडक; भीषण अपघातात साडेतीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू, दोघे जखमी

मुंबईतील बीकेसी येथे विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका कारने अन्य एका कारला धडक दिल्याने भीषण अपघात झाला.

accident
(फोटो सौजन्य- प्रातिनिधिक छायाचित्र, लोकसत्ता)

मुंबईतील बीकेसी येथे विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका कारने अन्य एका कारला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात एका साडेतीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला असून तर अन्य दोन व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी संध्याकाळी ५ च्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, विश्वास अट्टावर आरोपी चालकाचं नाव असून पोलीसांनी त्याला अटक केली आहे. तसेच गाडी चालवताना तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचे माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा – VIDEO: “अरे तू एका बाईसमोर हरला”, राणेंवर केलेल्या अजित पवारांच्या टीकेला दीपाली सय्यद यांचं प्रत्युत्तर, म्हणाल्या…

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी चालकाने मंगळवारी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास आधी बीकेसी पोलीस ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या ट्रॅफिक सिग्नलजवळ एक ऑटोरिक्षासह पादचाऱ्याला धडक दिली. त्यानंतर तिथून वेगाने पळ काढताना त्याने हॉटेल ट्रायडन्ट येथील मार्गावरून विरुद्ध दिशेने जात समोरून येणाऱ्या एका कारला धडक दिली. या भीषण अपघातात स्वाती चौधरी नावाच्या एका साडेतीन वर्षाच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला. तर तिचे काका ओम चौधरी (25) आणि त्यांचे मित्र विनोद यादव (46) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. दोघांनाही गुरु नानक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा – “विरोधकांना माफ केलं” म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना संजय राऊतांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “बाळासाहेबांचा पक्ष फोडणाऱ्यांना…”

याप्रकरणी पोलिसांनी आरोपी गाडी चालकाला ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात भादंवि आणि मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच अपघातादरम्यान आरोपी चालक मद्यधुंद अवस्थेत होता, अशी माहितीही पोलिसांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, आरोपी चालकाला न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने त्याला ५० हजाराच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-03-2023 at 12:33 IST