मुंबई : मध्य रेल्वेच्या भिवपुरी रोड ते कर्जत स्थानकांदरम्यान डाऊन मार्गावर १५ ते १९ फेब्रुवारी दरम्यान दररोज रात्री १.५० ते पहाटे ४.५० या वेळेत देखभाल आणि दुरुस्तीसाठी विशेष वाहतूक ब्लॉक घेण्यात येत आहे. हे पाच दिवस उपनगरी सेवेच्या वेळापत्रकात काही बदल केले गेले आहेत. रात्री १२.२४ वाजता सीएसएमटी येथून कर्जतसाठी सुटणारी लोकल बदलापूपर्यंतच धावेल. तसेच रात्री २.३३ वाजता कर्जत येथून सुटणारी लोकल बदलापूर स्थानकातून सोडण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
