पुनर्विकास रखडलेला असल्याने नागरी सुविधांवरही परिणाम होतो. मात्र  पुनर्विकासाच्या प्रक्रियेत जलवाहिन्या, मलनिसारण वाहिन्या, लाद्या दुरुस्ती, शौचालये यांची कामे होणार असून त्यासाठी नगरसेवक निधी व प्रभाग निधी वापरण्याची परवानगी पालिकेने दिली आहे.
शहरातील अनेक चाळी-इमारतींचा पुनर्विकास सध्या सुरू आहे. मात्र त्यात अनेक वर्ष जातात. शिवाय नागरी सुविधा मिळवताना चाळींना अडचणी येतात. तेव्हा प्रत्यक्ष पुनर्विकास सुरू होईपर्यंत या चाळींना नागरी सुविधा मिळाव्यात अशी मागणी नगरसेवक मनोज जामसूतकर यांनी केली होती. प्रशासनाने ही मागणी मान्य केली असून त्यासाठी नगरसेवक तसेच प्रभाग निधी वापरण्यास परवानगी दिली आहे.