मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षणाची सोडत काढण्यास सुरुवात झाली आहे. वांद्रे पश्चिम येथील बालगंधर्व रंगमंदिरात ही आरक्षण सोडत सुरू आहे. सर्वात आधी लोकसंख्येच्या आधारे अनुसूचित जाती जमातीसाठी आरक्षण जाहीर झाले.
यावेळी पालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी, उपायुक्त विश्वास शंकरवार उपस्थित होते. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार पारदर्शक ड्रममध्ये चिट्ठ्या टाकून त्यातून सोडत काढण्यात आली.
यंदाच्या निवडणुकीसाठी चक्रानुक्रमे पद्धतीकरीता प्रथम निवडणूक ग्राह्य धरण्यात आली आहे. म्हणजे अनुसूचित जाती जमातीच्या लोकांची टक्केवारी ज्या प्रभागात आहे ते पहिले पंधरा प्रभाग आरक्षित झाले आहेत.
मुंबई महानगरपालिकेचे २२७ प्रभाग असून त्यापैकी ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव असतात. तर अनुसूचित जातींसाठी १५, अनुसूचित जमातींसाठी २ , इतर मागासवर्गासाठी ६१ जागा राखीव असतात. या राखीव जागांमधील निम्म्या जागा महिलांसाठी राखीव असतात.
महिलासाठी राखीव जागांची सोडत लक्ष्मीनगर शाळेच्या विद्यार्थ्यांनी ही सोडत काढली.
अनुसूचित जाती जमातीसाठी या माजी नगरसेवकांचे प्रभाग आरक्षित
९३ …रोहिणी कांबळे (ठाकरे) …वांद्रे पूर्व
११८…उपेंद्र सावंत (शिंदे)…विक्रोळी पूर्व
१३३ …परमेश्वर कदम ….(शिंदे ) …घाटकोपर पूर्व
१४० ….नादिया शेख ….(कॉंग्रेस) …गोवंडी
१४१ …विठ्ठल लोकरे (ठाकरे) ….देवनार
१४६ …समृद्धी काते (शिंदे) …चेंबूर
१४७ …अंजली नाईक (शिंदे) …चेंबूर
१५१ …राजेश फुलवारिया (भाजप) …चेंबूर
१५२ ….आशा मराठे (भाजप) ….चेंबूर
१५५ …श्रीकांत शेट्ये (ठाकरे) ..चेंबूर
१८३ ….गंगा माने (कॉंग्रेस आता शिंदे गटात)
१८६ …वसंत नकाशे (ठाकरे ) …धारावी
१८९ …हर्षला मोरे (ठाकरे) …माटुंगा
२१५ …अरुंधती दुधवडकर (ठाकरे) …ताडदेव
२६…. प्रीतम पंडागळे (भाजप)
अनुसूचित जमाती
५३ ….रेखा रामवंशी (ठाकरे) …गोरेगाव
१२१…. चंद्रवती मोरे (शिवसेना)
आरक्षित झालेल्या प्रभागापैकी हे प्रभाग महिलांसाठी आरक्षित आहेत.
अनुसूचित जाती महिला : १३३, १८३, १४७, १८६, १५५, ११८, १५१, १८९
अनुसूचित जमाती महिला : १२१
आकडेवारी
मुंबईची एकूण लोकसंख्या ……१ कोटी २४ लाख ४२ हजार ३७३
अनुसूचित जातींची लोकसंख्या …..८ लाख ३ हजार २३६
अनुसूचित जमातींची लोकसंख्या ….१ लाख २९ हजार ६५३
प्रत्येक प्रभागातील लोकसंख्या सरासरी ५२ हजार ७२२
