अमिताभ यांच्या शॉर्टफिल्मनंतर अक्षयचे गाणे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : संचारबंदी असली तरी कलेचाच ‘किडा’ तो.. वळवळल्या शिवाय कसा राहील? असाच किडा एकमेकांपासून ‘कोसो’ दूर असलेल्या कलाकारांच्या डोक्यात वळवळला. त्याला प्रायोजकांची आणि तंत्राची साथ मिळाली आणि तयार झाली एका ‘फॅमिली’ची गोष्ट. आपल्या हरवलेल्या चष्म्याचा शोध घेत घेत सध्या घरातच राहणे कसे आपल्या हिताचे आहे, हे सांगणारी अमिताभ बच्चन यांची देशभरातील नामांकित कलाकारांना एकत्र घेऊन करण्यात आलेली  ‘फॅमिली’ ही शॉर्ट फिल्म सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. करोना विषाणूविरुद्धच्या या लढय़ात सगळ्यांनी घरातच राहणे महत्त्वाचे आहे हा संदेश देणारी ही मजेशीर फिल्म या कलाकारांनी आपापल्या घरातच राहून चित्रित के ली आहे. जाहिरात विश्वातील अग्रणी दिग्दर्शक  प्रसून पांडे यांनी या शॉर्टफिल्मचे व्हर्च्युअल दिग्दर्शन केले आहे. तंत्राच्या मदतीने आणि आपल्या सहकलाकारांना एकत्रित आणून अमिताभ बच्चन यांनी केलेली ही फिल्म पाहिल्यानंतर आता अक्षय कुमारही असाच प्रयत्न करत आहे.

अमिताभ बच्चन, रजनीकांत, माम्मुट्टी, प्रोसेनजीत, दिलजीत दोसैन, रणबीर कपूर, अलिया भट्ट, प्रियांका चोप्रा यांच्याबरोबरीने मराठमोळी अभिनेत्री सोनाली कु लकर्णीही या शॉर्टफिल्मचा महत्त्वाचा भाग आहे. खुद्द अमिताभ बच्चन यांनी आपल्याला फोन करून या शॉर्टफिल्ममध्ये सहभागी होण्याविषयी विचारणा के ली होती, असे सोनालीने सांगितले. करोनाचा प्रसार होऊ नये यासाठी लोकांनी घरात राहणे महत्त्वाचे असून त्याबद्दल जनजागृती करण्यासाठी देशभरातील कलाकारांना एकत्र घेऊन अशा पद्धतीची शॉर्टफिल्म आम्ही करत आहोत. यात मराठी चित्रपटसृष्टीची प्रतिनिधी म्हणून तू सहभागी होशील का? अशी विचारणा अमिताभ यांनी के ल्याची आठवण सोनालीने सांगितली. अमिताभ यांचा फोन आला तेव्हा अंगावर काटा आला होता. ते असे काही विचारतील, याची कल्पनाच नव्हती. आणि के वळ अमिताभच नव्हे तर रजनीकांत, रणबीर, प्रियांका, अलिया अशा मोठमोठय़ा कलाकारांचा सहभाग असलेल्या या शॉर्टफिल्मचा भाग होता आल्याबद्दल खूप आनंद वाटल्याचेही सोनालीने सांगितले.

‘फॅ मिली’ ही शॉर्टफिल्म बनवण्यासाठी अमिताभ बच्चन यांनीच पुढाकार घेतला, त्यांनी स्वत: सगळ्या कलाकारांना एकत्र आणत ही कल्पना ‘कल्याण ज्वेलर्स’ आणि ‘सोनी पिक्चर्स एन्टरटेन्मेट’च्या सहकार्याने प्रत्यक्षात आणली आहे. या शॉर्टफिल्मचा उद्देश के वळ जनजागृती इतकाच नसून यातून जमा होणाऱ्या आर्थिक निधीतून संपूर्ण चित्रपटसृष्टीत रोजंदारीवर काम करणाऱ्या कलाकार आणि तंत्रज्ञांना या करोना आपत्तीच्या काळात आर्थिक मदत दिली जाणार आहे. अभिनेता अक्षय कु मारही करोनासंदर्भात जनजागृती करण्याच्या उद्देशाने व्हर्च्युअल तंत्रज्ञानाच्या मदतीने गाणे करत असून यात कार्तिक आर्यन, टायगर श्रॉफ, अनन्या पांडे, भूमी पेडणेकर, तापसी पन्नू यांचा सहभाग असणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actors short films family says about the importance of staying at home zws
First published on: 08-04-2020 at 02:03 IST