खराब रस्ते आणि खड्डय़ांची तक्रार करता यावी याकरिता नागरिकांना तक्रार निवारण यंत्रणा उपलब्ध करून देणे ही जशी पालिकेची जबाबदारी आहे तशीच या तक्रार निवारण यंत्रणेबाबत लोकांना माहिती करून देण्याच्या दृष्टीने त्याला व्यापक प्रसिद्धी देणे हीसुद्धा पालिकेची जबाबदारी असल्याचे उच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट केले. तसेच या यंत्रणेबाबत लोकांना जागरूक करण्याच्या दृष्टीने तिला व्यापक प्रसिद्धी देण्याचे पालिकेला आदेश दिले. तसेच यंत्रणांनी या मुद्दय़ाबाबत काय उपाययोजना केल्या आहेत आणि त्यांच्याकडे खड्डय़ांच्या किती तक्रारी आल्या आहेत, कितींचा पाठपुरावा केला आहे याचा १० सप्टेंबपर्यंत तपशील सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
संग्रहित लेख, दिनांक 27th Aug 2015 रोजी प्रकाशित
‘खड्डय़ांच्या तक्रारींसाठीच्या यंत्रणेला प्रसिद्धी द्या’
खराब रस्ते आणि खड्डय़ांची तक्रार करता यावी याकरिता नागरिकांना तक्रार निवारण यंत्रणा उपलब्ध करून देणे ही जशी पालिकेची जबाबदारी आहे ..
First published on: 27-08-2015 at 12:02 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bombay high court wants bmc to publicise pothole forum