ठाण्यातील शिळफाटा-महापे रस्त्यावर लकी कम्पाउंडमध्ये आठ मजली इमारत गुरुवारी संध्याकाळी कोसळली. इमारतीखाली अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाचे जवान पोहोचले असून, स्थानिक नागरिकांच्या मदतीने ढिगाऱयाखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
दोन महिन्यांमध्ये या आठ मजली इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले होते. नवव्या मजल्यावर टाकी बांधण्याचे काम सध्या सुरू होते. त्याचवेळी ही इमारत पत्त्याप्रमाणे कोसळली. इमारतीमधील ३६ खोल्यांमध्ये लोकं राहात असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्याचबरोबर दुसऱया मजल्यावर क्लासेस चालत असल्याने त्यातील मुलेही इमारतीखाली अडकली असण्याची शक्यता आहे.
स्थानिक नागरिकांनी या इमारतीच्या बांधकामाविरोधात महापालिकेकडे तक्रार केली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते.
(संग्रहित छायाचित्र)
संग्रहित लेख, दिनांक 4th Apr 2013 रोजी प्रकाशित
ठाण्यात आठ मजली इमारत कोसळली; अनेक जण अडकल्याची भीती
ठाण्यातील शिळफाटा-महापे रस्त्यावर लकी कम्पाउंडमध्ये आठ मजली इमारत गुरुवारी संध्याकाळी कोसळली.

First published on: 04-04-2013 at 07:51 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Building collapse near shilphata at thane