महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात या तीन राज्यांचे कामकाज पाहणारे पश्चिम विभागीय सीए संस्थेचे कार्यालय यंदाचे सवरेकृष्ट कार्यालय ठरले आहे. या विभागात ७८ हजार सीएंची नोंदणी असून सुमारे तीन लाख विद्यार्थी शिक्षण घेत
आहेत.
चार्टट अकाऊंटंट ऑफ इंडिया या देशातील ‘सीए’च्या शिख संस्थेतर्फे देशात सवरेत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विभागाला दरवर्षी विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. हा मान यंदा पश्चिम विभागाला मिळाला असून या विभागाचे कार्यालय मुंबईतील कुलाबा येथे आहे.
विभागाचे अध्यक्ष मंगेश किनारे यांनी ‘रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म’ या त्रिसूत्रीचा अवलंब करून विभागाचा कायापालट केला. विभागतर्फे नवीन विद्यार्थ्यांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. याचबरोबर नव्याने प्रॅक्टिस सुरू करणाऱ्या सीएना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यशाळा, कौशल्य विकास उपक्रम, नेटवर्किंग भेटी असे विविध उपक्रम राबविण्या सुरूवात केली आहे.
या विभागकडून वर्षभरात विद्यार्थी आणि सीएंसाठी विक्रमी परिषदांचे आयोजन करण्यात आले. तसेच त्यांनी सीए आणि विद्यार्थ्यांना उपयुक्त अशा विविध नियतकालिकेही सुरू केली असून याचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. तसेच विभागातर्फे विविध सामाजिक उपक्रमही राबविले गेले.
यामध्ये मुंबई पोलिसांना ‘व्यावसायिक साक्षरता’ प्रशिक्षण देण्यात आले. या सर्व कामगिरीसाठी हा सन्मान मिळाला आहे.
याशिवाय विभागच्या विद्यार्थी विभागालाही उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
आहे.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Mar 2014 रोजी प्रकाशित
सीए संस्थेचा पश्चिम विभाग सर्वोत्कृष्ट
महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात या तीन राज्यांचे कामकाज पाहणारे पश्चिम विभागीय सीए संस्थेचे कार्यालय यंदाचे सवरेकृष्ट कार्यालय ठरले आहे.
First published on: 03-03-2014 at 05:25 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ca institution western department best