फर्निचरचे काम करण्यासाठी आलेल्या दोन सुतारांनीच घरातील महिलेची चोरीच्या उद्देशातून गळा दाबून हत्या केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. सुतारांना अंबरनाथमधील चिंचपाडा भागातून अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
खुशबू परेश मेहता (वय २४) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. ती आधारवाडी येथील मंजुळा पॅलेसमध्ये पाचव्या माळ्यावर राहत होती.
अबू आस लतिफ अन्सारी (वय २६), मोहम्मद शमीन युसूफ सिद्धिकी (वय १८) अशी आरोपींची नावे आहेत. अबू व मोहम्मद हे खुशबू यांच्या घरात फर्निचरचे काम करीत होते. त्यांनी खुशबू घरात एकटी असल्याचा फायदा उठवून तिची मंगळवारी गळा दाबून हत्या केली. घरातील सामान, कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त पडले होते. खुशबूची आई मंगळवारी दुपारपासून तिच्याशी मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत होती. प्रतिसाद मिळत नसल्याने ती रात्री खुशबूच्या घरी आली तेव्हा तिला घरात खुशबूचा मृतदेह आढळून आला. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हालचाली करून अंबरनाथ येथून दोघा सुतारांना अटक केली. त्यांनी हत्येची कबुली दिली आहे. चोरीच्या उद्देशाने खून
संग्रहित लेख, दिनांक 4th Jul 2013 रोजी प्रकाशित
कल्याणमध्ये सुतारांकडून महिलेची हत्या
फर्निचरचे काम करण्यासाठी आलेल्या दोन सुतारांनीच घरातील महिलेची चोरीच्या उद्देशातून गळा दाबून हत्या केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. सुतारांना अंबरनाथमधील चिंचपाडा भागातून अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

First published on: 04-07-2013 at 03:26 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Carpenter kills a woman