अशोक अडसूळ

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात कशेळी गावच्या सडय़ावर असलेल्या कातळशिल्पाला ‘राज्य संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. आणखी ८ कातळशिल्पांना हा दर्जा देण्याची प्रक्रिया सुरु असली तरी प्रस्तावित तेल शुद्धीकरण प्रकल्प असलेल्या बारसूमधील कातळशिल्पांना मात्र संरक्षित स्मारकाच्या यादीतून वगळण्यात आले आहे. 

Ambazari, Nagpur, housing project,
प्रकल्प अवैध, तरी प्रशासनाची डोळेझाक! नागपूरच्या अंबाझरीतील गृहप्रकल्पावर पर्यावरणवाद्यांचा आक्षेप
Loksatta explained Is environmental regulation being violated for Gadchiroli steel project
विश्लेषण: गडचिरोलीच्या पोलाद प्रकल्पासाठी पर्यावरण नियमाचा भंग होतो आहे का?
Navi Mumbai, Vashi Sector 9, Park encroachment, Navi Mumbai municipal Authorities, Encroached Park Spaces in navi Mumbai, CIDCO redevelopment,Municipal Corporation, Property Department, Urban Planning, Godrej Developers,
नवी मुंबई : टॉवरच्या आडून उद्यानांवर घाला? गिळंकृत झालेली उद्याने मिळविण्यासाठी महापालिकेची धडपड
European tracking device, vultures,
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील १० पांढऱ्या गिधाडांना युरोपातील ट्रॅकिंग डिव्हाईस!
Kamathipura Redevelopment Project land owner compensation stamped
कामाठीपुरा पुनर्विकास प्रकल्प : जमीन मालकाच्या मोबदल्यावर शिक्कामोर्तब
Khaparkheda power plant ,
नागपूर : कन्हान नदीत राख प्रकरणात खापरखेडा वीज प्रकल्प अडचणीत, एमपीसीबीच्या पथकाकडून…
mofa act will be applicable on project not registered under rera
मोफा कायदा यापुढे रेरा नोंदणी नसलेल्या प्रकल्पांनाच! दुरुस्ती विधेयक लवकरच मंजुरीसाठी
thane ghodbunder rmc project marathi news
घोडबंदरच्या भरवस्तीतील आरएमसी प्रकल्प सुरूच, आरोग्य समस्या उद्भवण्याच्या भीतीने नागरिक चिंताग्रस्त; संबंधित यंत्रणेचे होतेय दुर्लक्ष

रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १७० गावांमध्ये १७०० पेक्षा अधिक कातळशिल्पांचा शोध रत्नागिरीच्या ‘निसर्गयात्री’ संस्थेनेला लावला आहे. या कातळशिल्पांना संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार २०१८ साली रत्नागिरी जिल्हा पुरातत्व कार्यालयाने १८ कातळशिल्पांचे प्रस्ताव राज्य पुरातत्व विभागाला पाठवले होते. त्यातील १० कातळशिल्पांना संरक्षित स्मारक म्हणुन घोषित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. यापैकी कशेळीच्या कातळशिल्पाला संरक्षित स्मारकाचा मान सर्वप्रथम मिळाला आहे.

अन्य ८ कातळशिल्पांबाबत अधिसूचना काढण्यात आल्या असून त्यावरील हरकती तपासल्यानंतर त्यांनाही लवकरच हा दर्जा मिळू शकेल. मार्च २०२२ मध्ये ‘युनेस्को’ने रत्नागिरीतील ७ व सिंधुदुर्गातील एका कातळशिल्पास जागतिक वारसा स्थळाच्या संभाव्य यादीत स्थान दिले आहे. उक्षी, जांभरुण, कशेळी, रूंढेतळी, देवीहसोळ, बारसू, देवाचे गोठणे आणि फणसमाळ येथील या कातळशिल्पांचा जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समावेश होण्यासाठी संरक्षणाची जबाबदारी घेणे आवश्यक आहे. मात्र आता राज्य सरकारने यादीतून बारसूचे नाव वगळले आहे. 

बारसूचा प्रस्ताव का गुंडाळला?

बारसू गावच्या सडय़ावर अनेक कातळशिल्पे आहेत. मात्र येथे तेलशुद्धीकरण प्रकल्प प्रस्तावित आहे. संरक्षित स्मारक झाल्यास बांधकाम, खाणकाम करता येणार नाही. संरक्षक कठडे बांधावे लागेल व देखरेखीची जबाबदारी राज्य पुरातत्व विभागाकडे जाईल. बारसू तेल शुद्धीकरण प्रकल्पाचा विकास ‘एमआयडीसी’ करत आहे. भूसंपादनात कातळशिल्पे वगळय़ात येणार असून त्यांचे जतन सीएसआर फंडातून (सामाजिक उत्तरदारयीत्व निधी) करण्यात येईल, अशी माहिती उद्योग विभागातील सूत्रांनी दिली. त्यामुळेच पुरातत्व खात्याने प्रस्ताव पाठवूनही बारसूच्या कातळशिल्पांचे नाव मंत्रालय स्तरावर वगळण्यात आल्याची सांगितले जाते.

कोकणातील १७ कातळशिल्पांच्या जतनासाठी सरकारने ४ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद केली आहे. पावसाळा संपला की त्याभोवती कठडे बांधणे व इतर सुविधा निर्माण करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. आम्ही सर्व १७ कातळशिल्पांना संरक्षक स्मारक म्हणुन दर्जा मिळण्यासाठी प्रयत्नशील आहोत.

– डॉ. तेजस गर्गे, संचालक, पुरातत्व व वस्तुसंग्रहालये

कशेळी कातळशिल्पाची वैशिष्टय़े

  • रत्नागिरीपासून ३० किमीवर राजापूर तालुक्यातील कशेळी गावच्या सडय़ावर असलेले हे कातळशिल्प मध्याश्मयुगीन आहे.
  • देशातील कातळशिल्पापैकी हे सर्वात मोठे असल्याचे मानले जाते
  • १६ मीटर लांब आणि १४ मीटर रुंद हत्तीचे हे चित्र आहे. चित्रातील हत्तीचा कान ७ फूट आणि सोंड १८ फूट लांब आहे. हत्तीच्या पोटात इतर ८० चित्रे आहेत.
  • कातळशिल्पाजवळ अश्मयुगीन हत्यारे सापडली आहेत.