किंगफिशर एअरलाइन्सने आयडीबीआय बँकेकडून घेतलेल्या ९०० कोटी रुपयांच्या थकबाकीप्रकरणी किंगफिशर एअरलाइन्सचे मालक विजय मल्ल्या यांच्या घरी आणि कार्यालयावर सीबीआयने छापा टाकला आहे.
केंद्रीय अन्वेषण विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मल्ल्या यांच्या मुंबई, गोवा, बंगळुरूसह अन्य ठिकाणची निवासस्थानी व कार्यालयांवर छापे मारण्यात आल्याचे कळते. बँकेच्या नियमांचे उल्लंघन करून त्यांना कर्ज देण्यात आल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. यासंदर्भात मल्ल्या,किंगफिशर एअरलाइन्सचे मुख्य वित्तीय अधिकारी ए रघुनाथन आणि आयडीबीआय बँकेच्या काही अधिका-यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याप्रकरणी लवकरच विजय मल्ल्या यांची चौकशी होऊ शकते.
संग्रहित लेख, दिनांक 10th Oct 2015 रोजी प्रकाशित
विजय मल्ल्यांच्या घर, कार्यालयावर सीबीआयचा छापा
मल्ल्या यांच्या मुंबई, गोवा, बंगळुरूसह अन्य ठिकाणची निवासस्थानी व कार्यालयांवर छापे मारण्यात आल्याचे कळते.
Written by चैताली गुरवguravchaitali

First published on: 10-10-2015 at 17:54 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cbi raids vijay mallyas residence office in connection with loan default case