सीएसएमटी ते पनवेल वातानुकूलित लोकल ; गोरेगाव ते पनवेल लोकल फेऱ्याही सुरू

सामान्य लोकलच्या १२ फेऱ्यांऐवजी वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.

मुंबई: वातानुकूलित लोकलचा अनुभव आता हार्बरवासीयांनाही मिळणार आहे. सीएसएमटी ते पनवेल मार्गावर १ डिसेंबरपासून वातानुकूलित लोकल चालविण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. या लोकलच्या दिवसाला १२ फेऱ्या होतील. सामान्य लोकलच्या १२ फेऱ्यांऐवजी वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.

याशिवाय मध्य रेल्वेने हार्बरवरील काही लोकल फेऱ्यांच्या वेळापत्रकातही बदल केले असून त्यानुसार गोरेगाव व पनवेल प्रवाशांनाही दिलासा मिळाला आहे. प्रथमच गोरेगाव ते पनवेल लोकलही सोडल्या जाणार आहेत. त्याच्या १८ फेऱ्या १ डिसेंबरपासून होतील, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली. हार्बरवर अंधेरीपर्यंत होणाऱ्या लोकल फेऱ्यांचा गोरेगावपर्यंत विस्तार करण्यात आला आहे. अशा ४४ लोकल फेऱ्यांचा समावेश आहे.

वेळापत्रक : अप

वाशी-सीएसएमटी- स. ४.२५.

पनवेल -सीएसएमटी- स. ६.४५

पनवेल -सीएसएमटी- स. ९.४०

पनवेल -सीएसएमटी- दु. १२.४१

पनवेल -सीएसएमटी- दु. ३.४५

पनवेल -सीएसएमटी- सायं. ६.३७

डाऊन

सीएसएमटी -पनवेल- स. ५.१८

सीएसएमटी-पनवेल- स .८.०८

सीएसएमटी – पनवेल- स. ११.०४

सीएसएमटी- पनवेल- दु. २.१२

सीएसएमटी -पनवेल- सायं. ५.०८

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Central railway to run 12 ac local trains on harbour line from december 1 zws

ताज्या बातम्या