मुंबई : मध्य रेल्वेवरील वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून, यात नोकरदार वर्गाची संख्या अधिक आहे. नोकरदार वर्ग सुट्टीच्या दिवशी आपल्या कुटुंबीयासह सहलीचे नियोजन करत असून, वंदे भारतमधून १५ ते ३० वर्षे वयोगटातील आणि ३१ ते ४५ वर्षे वयोगटातील सर्वाधिक प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.

हेही वाचा >>> इंडियन पॅनोरमा विभागात एकाही मराठी चित्रपटाला स्थान नाही; गोव्यातील ‘इफ्फी महोत्सवा’त मराठी चित्रपटांची वानवा

मध्य रेल्वेवरून सीएसएमटी ते साईनगर शिर्डी, सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते मडगाव आणि नागपूर-बिलासपूर या वंदे भारत धावत आहेत. १५ सप्टेंबर ते १३ ऑक्टोबर या कालावधीत सीएसएमटी ते सोलापूर वंदे भारतमधून एकूण ५५ हजार ९०५ प्रवाशांनी प्रवास केला असून यात पुरुष ३४

हजार १६ प्रवासी आणि महिला २१ हजार ८८१ प्रवासी एवढय़ा प्रवाशांनी प्रवास केला. यामध्ये १ ते १४ वर्षे वयोगटातील २ हजार ४३८ प्रवाशांनी प्रवास केला. १५ ते ३० वर्षे वयोगटातील १८ हजार ७६४ प्रवासी आणि ३१ ते ४५ वर्षे वयोगटातील १८ हजार ४२ प्रवासी, ४६ ते ६० वर्षे वयोगटातील ११ हजार ५२८ प्रवासी आणि  ६० हून अधिक वर्षे वयोगटातील ५ हजार १३३ प्रवाशांनी प्रवास केला. त्यामुळे नोकरदार वर्ग त्यांच्या मुलांसह फिरण्यासाठी वंदे भारतचा वापर करत असल्याचे मध्य रेल्वेच्या अहवालातून स्पष्ट झाले. तृतीयपंथीयांचाही प्रतिसाद : वंदे भारतमधून तृतीयपंथीय प्रवाशांनीही प्रवास केला असून एकूण प्रवाशांपैकी ४.५ टक्के प्रवासी हे तृतीयपंथीय होते. यासह वंदे भारत सुरू केल्यापासून हवाई वाहतूक प्रवाशांमध्ये १० ते २० टक्क्यांची घसरण झाली आहे. ज्यामुळे हवाई भाडय़ात २० ते ३० टक्क्यांची घट झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तृतीयपंथीयांचाही प्रतिसाद : वंदे भारतमधून तृतीयपंथीय प्रवाशांनीही प्रवास केला असून एकूण प्रवाशांपैकी ४.५ टक्के प्रवासी हे तृतीयपंथीय होते. यासह वंदे भारत सुरू केल्यापासून हवाई वाहतूक प्रवाशांमध्ये १० ते २० टक्क्यांची घसरण झाली आहे. ज्यामुळे हवाई भाडय़ात २० ते ३० टक्क्यांची घट झाली आहे.