शिंदे गटाचे नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी “आम्ही मंत्रीपदाचा सट्टा लावून एकनाथ शिंदेंबरोबर जाण्याचा निर्णय घेतला,” असं वक्तव्य केलं. त्यानंतर त्यांच्या या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ काढून जोरदार चर्चा आहेत आहे. याबाबत भाजपाचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली. ते रविवारी (१२ मार्च) पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “गुलाबराव पाटील यांच्यासारखी माणसं ग्रामीण भागात वाढली आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात ज्या भाषेत बोलतात त्या भाषेत ते बोलले. शहरी भागात जरा पॉलिश करून बोलतात. जसं की, आम्ही ‘रिस्क’ घेतली. त्या ‘रिस्क’ला गुलाबराव पाटील आम्ही सट्टा खेळलो असं म्हटले.”

गुलाबराव पाटील काय म्हणाले होते?

गुलाबराव पाटील म्हणाले होते, “नागपूरपासून दादरपर्यंत सर्व आमदार गेले. मी एकटाच राहिलो असतो. मग, विकास करू शकलो असतो का? एकूण ४० आमदार फुटले. त्यात ३३ नंबरला मी गेलो, पण उद्धव ठाकरे चुकीच्या मार्गाने जात होते. त्यांना विनंती केली, हात जोडले, पाया पडलो.”

हेही वाचा : VIDEO: “ही ढेकूण चिरडायला गोळीबाराची गरज नाही”, उद्धव ठाकरेंच्या टीकेवर गुलाबराव पाटील म्हणाले, “आम्ही…”

“बहुमताचा आकडा जमला नसता तर? मात्र…”

“आपल्यातील एक मराठा चेहरा लांब जात आहे. तो जाता कामा नये. त्यांना समजवलं पाहिजे, असं उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं. त्यावर संजय राऊत म्हणाले, जायचं तर जाऊदे. मग मी पण गेलो. सरपंच पदाचा राजीनामा देताना लोकं विचार करतात. आम्ही तर आठ मंत्र्यांनी राजीनामा दिला होता. बहुमताचा आकडा जमला नसता तर? मात्र, आम्ही मंत्रीपदाचा सट्टा लावूनचा शिंदेंबरोबर जाण्याचा निर्णय घेतला,” असं गुलाबराव पाटलांनी सांगितलं.

हेही वाचा : ‘त्या’ वक्तव्यावरून आसाममधील विधानसभेत बच्चू कडूंच्या अटकेची मागणी, ते म्हणाले, “मला वाटलं…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“५० कोटी आणायला दोन ट्रक लागले असते ना”

“सात महिन्यांत एकनाथ शिंदे पाचवेळा जळगाव जिल्ह्यात आले आहेत. असा मुख्यमंत्री कोठेही सापडणार नाही. परंतु, आतापर्यंत त्यांच्याबरोबर होतो, तर चांगला होते. आता एकदम बिघडून गेलो. पश्चिम बंगालमध्ये २७ कोटी सापडले होते. ते आणण्याासठी एक ट्रक लागला. मग, ५० कोटी आणायला दोन ट्रक लागले असते ना,” असा सवाल खोक्यांच्या आरोपांवरून गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला.