मुंबई : दापोलीतील साई रिसॉर्टप्रकरणी तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे व रिसॉर्सटचे मालक सदानंद कदम यांच्यासह सहा आरोपींविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) विशेष सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या आरोपपत्रात माजी मंत्री परब यांचे नाव नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. देशपांडे व कदम यांना ईडीने अटक केली आहे.

याप्रकरणी ईडीने शनिवारी आरोपपत्र दाखल केले असून त्यात देशपांडे व कदम यांची नावे आहे. त्यांच्याशिवाय सुधीर शांताराम परदुले, विनोद दिपोलकर, सुरेश तुपे, अनंत कोळी यांच्या नावांचाही आरोपपत्रात समावेश आहे. याप्रकरणी आरोप झालेले माजी मंत्री अनिल परब यांचे नाव या आरोपपत्रात नसल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, कोणत्याही प्रकरणात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्याची तरतूद असते, असेही या अधिकाऱ्याने या वेळी स्पष्ट केले. 

केजरीवाल तुरुंगात काय खातात? ईडीच्या आरोपानंतर वकिलांनी न्यायालयात दिला ४८ जेवणांचा तपशील; इन्सुलिनबाबत न्यायमूर्ती म्हणाले…
Sanjay Singh alleges that Arvind Kejriwal is not allowed to meet his family face to face
केजरीवाल यांचे नीतिधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न! कुटुंबीयांना समोरासमोर भेटू दिले जात नसल्याचा संजय सिंह यांचा आरोप
girish mahajan statement on bjp mp unmesh patil
खासदार उन्मेश पाटील यांना चुकीची जाणीव होईल; गिरीश महाजन यांचा सूचक इशारा
Arvind Kejariwal Rape Accusations Of IIT Students
अरविंद केजरीवालांवर बलात्काराचा आरोप? प्रसिद्ध वृत्तपत्राचे कात्रण चर्चेत, अटकेचं खरं कारण काय?

 भाजप नेते किरीट सोमय्या हे दापोलीतील साई रिसॉर्टवरून अनिल परब यांना सातत्याने लक्ष्य करत आहेत. सोमय्या यांनी दापोली येथील साई रिसॉर्टच्या खरेदी-विक्री व्यवहारात गैरव्यवहार झाल्याचा आरोप केलेला होता. तसेच अनिल परब यांनी चार वर्षांपूर्वी, जुलै २०१८मध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकांसाठी दाखल केलेल्या शपथपत्रामध्ये या रिसॉर्टचा उल्लेख केला होता. त्यासाठी वीजजोडणी अर्जही त्यांनी केला होता. तसेच, या रिसॉर्टसाठी घरपट्टीही भरण्यात आली होती, असा दावा सोमय्यां यांनी केला होता. याप्रकरणी ईडी तपास करत आहे. मात्र, माझा या रिसॉर्टशी संबंध नाही. जो व्यवहार झाला तो कागदोपत्री झाला आहे. मी ही जागा सदानंद कदम यांना दिली आहे, असे अनिल परब यांनी यापूर्वी स्पष्ट केले आहे.