मुंबई: पश्चिम रेल्वेवरील जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमध्ये गोळीबार करून चौघांची हत्या केल्याप्रकरणी रेल्वे सुरक्षा दलाचा (आरपीएफ) बडतर्फ जवान चेतन सिंह चौधरी याच्याविरोधात बोरिवली रेल्वे पोलिसांनी शुक्रवारी आरोपपत्र दाखल केले. बोरिवलीतील महानगर दंडाधिकारी न्यायालयात हे एक हजार ९७ पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले असून त्यात १६९ साक्षीदारांच्या जबाबाचाही समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

हेही वाचा >>> आमदार अपात्रतेच्या ३४ याचिकांच्या एकत्रित सुनावणीवर नार्वेकरांचा महत्त्वाचा निर्णय

जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेसमध्ये ३१ जुलैला झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी पुंगळय़ा जप्त केल्या होत्या. तसेच शवविच्छेदनात मृतांच्या शरीरातूनही काही काडतुसे जप्त करण्यात आले. रायफलसह त्याही बॅलेस्टिक अहवालासाठी पाठवण्यात आल्या आहेत. सिंह याच्याकडे सेमी ऑटोमॅटिक असॉल्ट रायफल होती. त्याच्याकडे २० काडतुसे होते. त्यातील १२ गोळय़ा त्याने घटनेच्या दिवशी झाडल्या होत्या.