मुंबई : कोकणातील शाळांमध्ये शालोपयोगी उपक्रम सुरू करण्याच्या उद्देशाने १९७४ साली अक्षय्य तृतीयेला स्थापन झालेल्या ‘चतुरंग प्रतिष्ठान’ या सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक संस्थेने पन्नास वर्षांची वाटचाल पूर्ण केली आहे. या संस्थेचा सुवर्णमहोत्सवी सांगता सोहळा २८ – २९ सप्टेंबर दरम्यान मुंबईत होणार आहे.

या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याचे औचित्य साधत पं. उल्हास कशाळकर, पं. हरिप्रसाद चौरसिया, अशोक पत्की, महेश एलकुंचवार, दिलीप प्रभावळकर, रोहिणी हट्टंगडी, वासुदेव कामत, चंदू बोर्डे, डॉ. अनिल काकोडकर, बाबासाहेब कल्याणी आणि मेजर महेश कुमार भुरे अशा विविध क्षेत्रातील ११ दिग्गजांना ‘चतुरंग सुवर्णरत्न सन्मान’ देऊन गौरवण्यात येणार आहे.

हेही वाचा – सोमवारी अंधेरी, जोगेश्वरीत अर्धा दिवस पाणीपुरवठा बंद

हेही वाचा – मुंबई : १,३२२ गणेशोत्सव मंडळे मंडप परवान्याच्या प्रतीक्षेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चतुरंग प्रतिष्ठानने आपल्या पन्नास वर्षांच्या वाटचालीत ६१ विविधांगी उपक्रम राबवले. मुंबईपाठोपाठ डोंबिवली, पुणे, चिपळूण, रत्नागिरी, गोवा अशा सहा केंद्रांपर्यंत संस्थेने आपला कार्यविस्तार केला. १८०० हून अधिक कार्यक्रमांचा टप्पा पार करणाऱ्या चतुरंग प्रतिष्ठानला अनेक नामवंत, गुणवंत व्यक्तींचा पाठिंबा लाभला. त्यांच्या प्रति जाहीर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रत्नागिरी, चिपळूण, गोवा, डोंबिवली, पुणे येथे आनंद सोहळे आयोजित केल्यानंतर सुवर्णमहोत्सवी वर्षाचा सांगता सोहळा मुंबईत दादर येथे आयोजित करण्यात येणार आहे. यानिमित्ताने विविध क्षेत्रांतील ११ जणांना त्यांच्या उत्तुंग, देदिप्यमान कारकिर्दीबद्दल चतुरंग सुवर्णरत्न सन्मान देऊन गौरवण्यात येणार आहे.