राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी झाल्यानंतर पहिल्यांदाच दोन्ही गटांकडून मुंबईत अधिकृत बैठका होत आहेत. अजित पवारांच्या गटाच्या बैठकीत बंडखोर नेते छगन भुजबळ यांनी पहिल्यांदाच थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या निर्णयावर व धोरणांवर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी २०१९ च्या पहाटेच्या शपथविधीचा उल्लेख करत अनेक प्रश्न उपस्थित केले. ते बुधवारी (५ जुलै) मुंबईत आयोजित अजित पवार गटाच्या बैठकीत बोलत होते.

छगन भुजबळ म्हणाले, “अचानक निर्णय कसे होतात. २०१९ मध्ये पहाटेचा शपथविधी का झाला? त्याच्या पाठिमागे कोण होतं? देवेंद्र फडणवीस सांगतात शरद पवारांच्या सहमतीने सरकार स्थापन करण्याचा निर्णय झाला. शरद पवार म्हणतात की, मी गुगली टाकली. अरे पण गुगली टाकून आपल्याच गड्याला आऊट करायचं का?”

हेही वाचा : बंडानंतर खासदारकीचा राजीनामा देणार होता त्याचं काय झालं? अमोल कोल्हे म्हणाले, “शरद पवारांनी…”

“त्या गुगलीत आपलाच गडी आऊट झाला”

“त्या गुगलीत आपलाच गडी आऊट झाला. हे आम्हालाही माहिती नाही. असं का झालं ते इच्छा असेल तर अजित पवार सांगतील. कारण हा प्रश्न संपूर्ण हिंदुस्थानला पडला आहे. मात्र विचारलंच जात नाही,” असं मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं.

व्हिडीओ पाहा :

“अजित पवार सकाळीच उठून तिकडे का गेले?”

छगन भुजबळ पुढे म्हणाले, “२०१७ मध्ये मी तुरुंगात होतो त्यावेळीही काहीतरी प्रयत्न झाला होता. या सगळ्या मंडळींना माहिती आहे, मला माहिती नाही. २०१९ च्या निवडणुकीआधी आणि निवडणुकीनंतर काय बोलणी झाली. अजित पवार सकाळीच उठून तिकडे का गेले? ते असेच गेले का? त्याचं कारण काय हे जनतेला सांगितलं गेलं पाहिजे.”

हेही वाचा : शरद पवारांबाबत ‘तो’ प्रश्न विचारताच जितेंद्र आव्हाडांना अश्रू अनावर, म्हणाले, “त्यांचं वय ८४ वर्षे…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“ते अनेक नेत्यांना तोंडघशी पाडत आहेत”

“मला एक कळत नाही की, वारंवार दिल्लीत चर्चा केली जाते आणि काही दिवस झाले की त्यातून माघार घेतली जाते. त्यातून ते अनेक नेत्यांना तोंडघशी पाडत आहेत,” असं म्हणत छगन भुजबळ यांनी शरद पवारांच्या धोरणाला लक्ष्य केलं.