मुंबई : सांताक्रूझ-चेंबूरदरम्यानच्या प्रवासातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने छेडानगर परिसरात उड्डाण पूल बांधला असून तो सोमवारी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. यामुळे सांताक्रूझ-चेंबूरदरम्यानचा प्रवास झटपट होईल, असा दावा करण्यात येत आहे. या पुलामुळे ठाणे, नवी मुंबईतील प्रवाशांनाही दिलासा मिळणार आहे.

पूर्व द्रुतगती मार्गावरील छेडा नगर येथील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी एमएमआरडीएने छेडानगर रस्ते सुधार प्रकल्प हाती घेतला. या प्रकल्पाअंतर्गत छेडानगर येथे तीन उड्डाण पूल आणि एक सब-वे बांधण्यात येत आहेत. यातील पहिला तीन मार्गिकेचा पूल ६३८ मीटर लांबीचा असून हा शीव ते ठाणे पट्टय़ाला जोडणारा आहे. दुसरा दोन मार्गिकेचा उड्डाणपूल १२३५ मीटर लांबीचा असून हा पूल मानखुर्द रोड ते ठाण्याला थेट जोडणारा आहे. तर तिसरा ६३८ मीटर लांबीचा छेडानगर उड्डाणपूल सांताक्रुझ ते चेंबूर जोडरस्त्याला जोडणारा आहे. यासाठी २४९.२९ कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे. या प्रकल्पातील ६३८ मीटर लांबीच्या छेडानगर उड्डाणपुलाचे काम मागील महिन्याभरापूर्वीच पूर्ण झाले. त्यामुळे हा पूल मार्चमध्ये वाहतुकीसाठी खुला होणे अपेक्षित होते. मात्र थाटामाटात उद्घाटन करत पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन होते. पण मंत्र्यांची वेळ मिळत नसल्याने उद्घाटन पर्यायाने पूल वाहतुकीसाठी खुला करणे रखडले होते. या पार्श्वभूमीवर एमएमआरडीएवर टीका होत होती. त्यामुळे सरतेशेवटी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी उद्घाटनाची वाट न पाहता पूल खुला करावा असे आदेश एमएमआरडीएला दिले. या आदेशानुसार सोमवारपासून छेडानगर उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याची माहिती महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी दिली.  हा पूल खुला झाल्याने छेडानगर येथील वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होणार आहे. आता या प्रकल्पातील उर्वरित दोन पूल केव्हा सुरू होतात याकडे  लक्ष लागले आहे.

Vehicle overturned on Kapurbawadi flyover police appeal to use alternate route to avoid gridlock
कापूरबावडी उड्डाणपूलावर वाहन उलटले, कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे पोलिसांचे आवाहन
huge hoarding collapses in ghatkopar after dust storm and heavy rain
बेकायदा फलकाचे आठ बळी; घाटकोपरच्या छेडानगर परिसरातील दुर्घटनावादळात महाकाय होर्डिंग जमीनदोस्त, सुटकेसाठी रात्रभर बचावकार्य
Railway traffic, disrupted, pole,
मुलुंड ठाणे स्थानकादरम्यान पोल पडल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत, रस्त्यावरील वाहतूक ठप्प
water pipe burst during metro work water supply stopped in Colaba for eight hours on Saturday
मेट्रोच्या कामादरम्यान जलवाहिनी फुटली, कुलाब्यात शनिवारी आठ तास पाणी पुरवठा बंद राहणार
Due to malfunction in the signal system between Asangaon and Gaon station the train service was stopped for four and a half hours
सिग्नल यंत्रणेत बिघाड; साडेचार तास रेल्वेसेवा ठप्प; आसनगाव-आटगाव स्थानकादरम्यानची घटना
dombivli traffic jam marathi news, mankoli latest marathi news
माणकोली परिसरातील ग्रामस्थ धूळ, वाहन कोंडीने हैराण; पोहच रस्ते तयार न करताच पूल सुरू केल्याने नाराजीचा सूर
remaining three lanes of the Shilphata flyover are open for traffic in thane
ठाणे : शिळफाटा उड्डाणपूलाच्या उर्वरित तीन मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या
Special trains will run from Panvel to Margaon and Sawantwadi
मुंबई : पनवेल ते मडगाव, सावंतवाडी विशेष रेल्वेगाड्या धावणार