मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताला ‘जी २०’ परिषदेचे अध्यक्षपद मिळाले, ही अतिशय गौरवशाली बाब असून महाराष्ट्रात या परिषदेच्या १४ बैठका होणार आहेत. त्यातून राज्याच्या विकासाबरोबरच संस्कृती आणि शहरांचा लौकिक वाढविण्याची संधी (ब्रँडिंग) करण्याची संधी आहे. जगभरात महाराष्ट्राचे नावलौकीक वाढावा, यासाठी शहरांचे सुशोभीकरण व स्वच्छतेवर भर देऊन त्यात नागरिकांचा सहभाग वाढवावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘जी २०’ परिषदेनिमित्त महाराष्ट्रात होणाऱ्या बैठकांच्या तयारीचा आढावा मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीत घेतला. यावेळी पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्यासह विविध विभागांचे उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते.

भारताला ‘जी २०’ परिषदेचे अध्यक्षपद १ डिसेंबरपासून मिळाले असून ते ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत राहणार आहे. या कालावधीत देशभरात परिषदेच्या १६१ बैठका भारतात होणार असून त्यापैकी १४ बैठका महाराष्ट्रात होतील. मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर या महानगरांमध्ये या बैठका होणार आहेत. मुंबईमध्ये परिषदेच्या विकास कार्यगटाची बैठक १३ ते १६ डिसेंबर या कालावधीत  होणार आहे. त्यानंतर पुणे येथे १६ आणि १७ जानेवारीला पायाभूत सुविधा कार्यगटाची तर औरंगाबाद येथे १३ व १४ फेब्रुवारीला बैठक होणार आहे. नागपूर येथे २१ आणि २२ मार्चला काही कार्यक्रम होणार आहेत. त्यानंतर मुंबईत २८ आणि ३० मार्च, १५ ते २३ मे आणि ५ आणि ६ जुलै, १५ व १६ सप्टेंबर २०२३ याकालावधीत विविध बैठका होतील. पुणे येथे १२ ते १४ जून, २६ ते २८ जून याकालावधीत बैठका होणार आहेत. या परिषदेच्या आखणी व नियोजनाकरिता चार अधिकाऱ्यांची समन्वय समिती नेमण्यात आली आहे.

‘जी २०’ परिषदेचे अध्यक्षपद मिळणे मोलाचे आहे. आपल्याला देशाचे आणि महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करण्याची संधी मिळाली आहे. या परिषदेच्या बैठकांच्या आयोजनात कुठलीही उणीव राहू न देता या कार्यक्रमांमध्ये नागरिकांबरोबरच विविध खासगी संस्था व संघटनांनाही सहभागी करून घ्यावे.   – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chief minister deputy chief minister review preparation g 20 events zws
First published on: 03-12-2022 at 04:16 IST