निर्भया निधीतून घेतलेली वाहनं शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या ताफ्यात असल्यावरून महाविकासआघाडीच्या नेत्यांनी सडकून टीका केली. यानंतर आता भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी मविआवर गंभीर आरोप केले आहेत. “मविआ सरकारच्या काळात ९ मंत्र्यांच्या ताफ्यात निर्भया फंडातील वाहनं होती,” असा आरोप चित्रा वाघ यांनी केला. इतकंच नाही, तर सुप्रिया सुळेंच्याही ताफ्यात यातील वाहन असल्याचा गंभीर आरोप करत चित्रा वाघांनी यादीच वाचून दाखवली. त्या सोमवारी (१२ डिसेंबर) मुंबईत भाजपा कार्यालयात घेतलेल्या पत्रपरिषदेत बोलत होत्या.

“आणखी किती पापं करणार आणि ती कुठे फेडणार?”

चित्रा वाघ म्हणाल्या, “केंद्र सरकारकडून मिळालेल्या निर्भया निधीतून २२० वाहने खरेदी करायची. त्यातील १२१ वाहने पोलीस ठाण्यांना द्यायची आणि ९९ वाहने स्वत:च इतर विभागांना वाटायची. म्हणजे निर्भया पथकाची वाहने इतर विभागांना महाविकास आघाडी सरकारनेच दिलेली असताना आताच्या सरकारच्या नावाने बोंबा मारायच्या. अशी आणखी किती पापं करणार आणि ती कुठे फेडणार?”

nan patole
विशाल पाटलांवरील कारवाईस टाळाटाळ; सांगलीत काँग्रेस मेळाव्यात आघाडीचे काम करण्याचे आवाहन
Action taken by Tihar administration after Delhi Chief Minister Arvind Kejriwal  blood sugar rises
केजरीवालांना इन्सुलिन; रक्तातील साखर वाढल्यानंतर तिहार प्रशासनाकडून कार्यवाही
Eknath Shinde, Eknath Shinde group
सरकारच्या कामांचा लेखाजोखा मांडत शिंदे गटाचा प्रचार
CM Mamata Banerjee On Attack NIA team
‘एनआयए’च्या पथकावर जमावाचा हल्ला, ममता बॅनर्जी यांनी तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनाच सुनावले, म्हणाल्या, “मध्यरात्री लोकांच्या घरात…”

“मविआच्या नेत्यांकडून निर्भया पथकाच्या वाहनाबाबत कांगावा”

“गेल्या दोन दिवसांपासून निर्भया पथकाची वाहने मंत्र्यांच्या सुरक्षेसाठी वापरली, असा कांगावा विविध नेते करीत आहेत. महाविकास आघाडी सरकारच्याच काळात ४ फेब्रुवारी २०२२ रोजी निर्भया निधीतून २२० वाहने खरेदी करण्यात आली. या २२० वाहनांपैकी १२१ वाहने मुंबईतील एकूण ९४ पोलीस ठाण्यांना देण्यात आली, तर ९९ वाहने ही इतर विभागांना वितरित करण्यात आली. हे वितरण १९ मे २०२२ रोजी करण्यात आले,” असं चित्रा वाघ यांनी सांगितलं.

व्हिडीओ पाहा :

“९ मंत्र्यांच्या दावणीत ही निर्भया निधीची वाहने”

“सर्वांत आश्चर्य म्हणजे ९ मंत्र्यांच्या दावणीत ही निर्भया निधीची वाहने देण्यात आली, तर १२ वाहने व्हीव्हीआयपी ताफ्यासाठी देण्यात आली. यात मंत्री छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, सुनील केदार, सुनील तटकरे, सुभाष देसाई इत्यादींचा समावेश होता. खासदार सुप्रिया सुळे यांच्या ताफ्यासाठीही याच निर्भया निधीतून घेण्यात आलेली वाहने वापरण्यात आली. सुप्रिया सुळे यांनी सुद्धा निर्भया निधीतील वाहन वापरायचे आणि इकडे मात्र शिंदे-फडणवीस यांच्या सरकारवर टीका करायची, हा दुटप्पीपणा कशाला?” असा प्रश्न चित्रा वाघ यांनी विचारला.

“वाहतूक विभाग वरळीला १७ वाहने देण्यात आली”

चित्रा वाघ पुढे म्हणाल्या, “वस्तुत: निर्भया निधीतून खरेदी करण्यात आली असताना ती पोलीस विभागाने जलद प्रतिसाद पथक, श्वान पथक, संरक्षण शाखा, सुरक्षा शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, विशेष शाखा, लाचलुचपत विभाग, मोटर परिवहन विभाग इत्यादी विभागांना करण्यात आले. हीच वाहने वाहतूक विभाग वरळीला १७ वाहने देण्यात आली.”

हेही वाचा : VIDEO: आरोग्य विभागावर मंत्र्यांचा वचक नाही का? मेळघाटातील कुपोषण मृत्यूवरील प्रश्नावर मंत्री लोढा म्हणाले…

“तत्कालिन गृहविभागाला लाज वाटली नाही का?”

“आदित्य ठाकरेंच्या वरळीवर विशेष लक्ष दिले गेले, हे ठीक. पण, निर्भया पथकाची वाहने आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात देताना तत्कालिन गृहविभागाला लाज वाटली नाही का? आता आमचे सरकार आहे, तर ही सर्व वाहने पुन्हा निर्भया पथकासाठी देण्याची कार्यवाही वेगाने सुरू आहे. ती येत्या आठवडाभरात पूर्ण होईल,” असेही चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.