शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज ठाणे दौऱ्यावर आहेत. यावेळी पक्षाच्यावतीने आयोजित महाआरोग्य शिबीराचे उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडेल. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे प्रथमच ठाणे शहरातील पक्षाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. दरम्यान, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंचा दौरा, शिवसेनेतील बंडाळीनंतर प्रथमच ठाण्यात

काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?

आज प्रजासत्ताक दिनानिमित्त वर्षा निवासस्थानी पार पडलेल्या ध्वजारोहणानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना उद्धव ठाकरे यांच्या ठाणे दौऱ्याबाबत विचारण्यात आलं, यांसदर्भात बोलताना, ”लोकशाहीत प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार असतो”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच आज अनेक ठिकाणी पालकमंत्री नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडत आहे. त्यामुळे मंत्रीमंडळ विस्तार नेमका कधी होईल? असं विचारलं असता, ”लवकरच मंत्रीमंडळाचा विस्तार होईल”, अशी माहितीही त्यांनी दिली.

हेही वाचा – “सत्तेसाठी वाट्टेल ते सहन करणार नाही”, शरद पवारांवरील ‘त्या’ विधानावरून आव्हाडांचा प्रकाश आंबेडकरांना इशारा; म्हणाले, “मविआतील…”

लवकरच मंत्रीमंडळ विस्तार

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून जुन्या पेंशनचा मुद्दा गाजतो आहे. याबाबत सरकार सकारात्मक असून अभ्यास करून लवकरच निर्णय घेतल्या जाईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. यावेळी प्रकाश आंबडेकरांनी शरद पवारांबाबत केलेल्या विधनासंदर्भात विचारलं असता, त्यांनी उत्तर देणं टाळलं. शरद पवार हे मोठे नेते आहेत आणि प्रकाश आंबेडकर आमचे स्नेही आहेत, त्यामुळे मी यावर भाष्य करणार नाही, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – Republic Day 2023 : “…तर हे विद्यमान राज्यकर्त्यांना ठणकावून सांगावंच लागेल”, शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण

तत्पूर्वी ७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘वर्षा’ या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ध्वजावतरण करून ध्वजवंदन केले. यावेळी त्यांनी प्रजासत्ताक दिनीनिमित्त वर्षा बंगल्यावर कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवाना, तसेच राज्यातील जनतेलाही शुभेच्छा दिल्या.