मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज ( ३ मार्च ) विधानसभेत बोलताना जोरदार फटकेबाजी करत विरोधी पक्षनेते अजित पवार यांना लक्ष्य केलं. अजितदादा तुम्ही बोलता गोड, पण तुमचा कार्यक्रम सुरु असतो. त्यामुळे यापुढे असं पोटदुखीचे प्रसंग वारंवार येतील. त्यासाठी जालीम औषध म्हणून बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु केला आहे, असा टोला एकनाथ शिंदेंनी अजित पवारांना लगावला आहे.

“सत्तांतर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले नसल्याने दादांना धक्का बसल्याचं त्यांनी सांगितलं. भगतसिंह कोश्यारी सुद्धा आश्चर्यचकीत झाल्याचं दादांनी म्हटलं. पण, आपण देखील उपमुख्यमंत्रीपदाची साखर झोपेत असताना शपथ घेतली. मला फोन आला, टीव्ही बघतोय तर दादा शपथ घेताना दिसत आहेत. मी त्यांना बोललो हे माघचं आहे. ते म्हणाले माघचं नाही, आताचं आहे. जयंत पाटलांना फोन केला तर त्यांनीही नाही उचलला. तो मोठा धक्का होता,” असं एकनाथ शिंदे म्हणाले.

हेही वाचा : भटक्या कुत्र्यांबाबत बच्चू कडूंचा सरकारला अजब सल्ला; गुवाहाटीचा उल्लेख करत म्हणाले…

“तेव्हाच्या शपथविधीबाबत काही कथा बाहेर येत आहे. देवेंद्र फडणवीसांनी मला दोन-चार कथा सांगितल्या आहेत. त्या बोलल्या तर अनेक लोकांचं अवघड होईल. देवेंद्र फडणवीस बोलतील, तेव्हा सर्वांना धक्का बसेल, एवढी खात्री बाळगा,” असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं.

हेही वाचा : “रोग हाल्याला अन् इंजेक्शन…”, ST कर्मचाऱ्याला निलंबन केल्यावरून अजित पवार शिंदे सरकारवर संतापले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“निवडणुका आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटनला आले, असं तुम्ही म्हणता. बजेट केलं, तर निवडणुका आल्याने केलं म्हणता. आम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन काम करत नाही. निवडणुका असल्या नसल्या आमचं काम सुरु राहणार आहे. निवडणुकांची आम्हाला पर्वा नाही,” असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.