लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

मुंबई : देशभरात तसेच परदेशात सक्रिय असलेल्या २२ हजारहून अधिक दहशतवाद्यांची माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) संकलित केली आहे. दहशतवाद्यांविरुद्ध देशात दाखल झालेल्या हजारो गुन्ह्यांची माहितीही एका क्लिकवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. अमेरिकेने तयार केलेल्या ‘ग्लोबल टेररिझम डेटाबेस’च्या धर्तीवर राष्ट्रीय दहशतवाद माहिती संकलन आणि विश्लेषण केंद्राची (एमटीडीसी-फॅक) स्थापना करण्यात आली आहे.

survey shows citizens have no confidence in food inspection agencies
खाद्यपदार्थांची तपासणी करणाऱ्या संस्थांच्या कार्यप्रणालीवर नागरिकांचा अविश्वास, सर्वेक्षणातून माहिती उघडकीस
National Institute of Nutrition job post
ICMR Recruitment 2024 : राष्ट्रीय पोषण संस्थेमध्ये विविध पदांवर होणार भरती! ‘इतक्या’ हजारांपर्यंत मिळणार पगार
bank of Maharashtra loan disbursement increased by 16 percent
‘महाबँके’च्या कर्ज वितरणात १६ टक्क्यांची वाढ
wheat, farmers
केंद्राचा ‘हा’ निर्णय गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर?

२००८ मध्ये मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय तपास यंत्रणेलाच आता दहशतवादी कारवायांबाबत गुप्तचर विभागाकडून माहिती दिली जात आहे. त्यामुळे विविध राज्यांतील दहशतवादविरोधी पथकांना स्वतंत्रपणे स्रोत उभा करावा लागत आहे. दहशवाद्यांविरोधात कारवाई करण्याची जबाबदारी असलेल्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने आता तब्बल १५ वर्षांनंतर असा डेटाबेस तयार केला आहे.

आणखी वाचा-महारेराचे नवीन संकेतस्थळ फेब्रुवारी अखेर कार्यान्वित

एका अतिवरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, इंडियन मुजाहीद्दीन, लष्कर-ए-तय्यबा या प्रमुख संघटनांसह देशात बंदी असलेल्या सर्व दहशतवादी संघटनांची माहितीही त्यांच्या म्होरक्यांसह उपलब्ध करुन दिली आहे. गेल्या वर्षांत राष्ट्रीय तपास यंत्रणेने जोरदार कारवाई करीत तब्बल ६२५ दहशतवाद्यांना अटक केली आहे.

या शिवाय आतापर्यंत दहशतवादी कारवायांमध्ये गुंतलेल्या सर्वच दहशतवाद्यांची माहिती आणि त्यांच्या संघटनेचे नाव, बोटांचे ठसे, ध्वनिचित्रफित, छायाचित्रे तसेच समाजमाध्यमांवरील प्रोफाईल आदी सर्वच तपशील संकलित करण्यात आल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले. राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे दहशतवादी कारवायांशी संबंधित असलेल्या ९२ लाख संशियतांच्या बोटांचे ठसे आहेत. याशिवाय अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या पाच लाखांहून अधिक आरोपींची माहितीही त्यांच्या अलीकडील छायाचित्रांसह संकलित करण्यात आली आहे. दहशतवादी संघटनांना अर्थपुरवठा करणाऱ्या संशयितांबाबतही संपूर्ण तपशील आता उपलब्ध करून देण्यात आला आहे. सीसीटीव्हीवरील छायाचित्रावरून आरोपीला ओळखण्याचे तंत्रही विकसित करण्यात आल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.

आणखी वाचा-शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील कंत्राटी डॉक्टरांच्या मानधनात दुपटीने वाढ

दहशतवाद समूळ नष्ट करण्यास ही अत्याधुनिक यंत्रणा फायदेशीर ठरणार आहे. राज्यांतील दहशतवादविरोधी पथकांनाही त्यामुळे आयती माहिती उपलब्ध होणार आहे. प्रत्येक राज्यातील दहशतवादविरोधी पथकाने त्या-त्या राज्यातील दहशतवादी कारवायांची माहिती संकलित केली आहे. परंतु त्यांना देशभरातील कारवायांची माहिती या नव्या डेटाबेसमुळे उपलब्ध होऊन चांगला समन्वय साधता येईल, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.