मुंबई : साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटी आणि श्री षण्मुखानंद फाईन आर्ट व संगीत सभा या संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या ‘द स्पिरिट ऑफ मुंबई’ पुरस्काराने शनिवारी मुंबईतील करोना योद्ध्यांना गौरविण्यात आले. यावेळी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त, प्रशासक इक्बाल सिंह चहल यांना राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ‘द स्पिरिट ऑफ मुंबई’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटी आणि श्री षण्मुखानंद फाईन आर्ट व संगीत सभा यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास सोसायटी व सभेचे अध्यक्ष डॉ. व्ही. शंकर, अणुउर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डाॅ. आर. चिदंबरम, संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. व्ही. रंगराज, उपाध्यक्ष एम. व्ही. रामनारायण आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा – संजय राऊतांविरोधातील हक्कभंगाचं प्रकरण राज्यसभेच्या सभापतींकडे वर्ग; खासदारकी जाणार?

हेही वाचा – जपानी पद्धतीच्या ‘कोई फिश पाँड’ची जोड देत पुरातन ‘सेठ सामलदास नरसीदास प्याऊ’चे संवर्धन; राणीच्या बागेतील आकर्षणात भर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यपालांच्या हस्ते यावेळी चहल यांच्यासह धारावी येथे सेवा बजावणारे सहायक आयुक्त किरण दिघावकर, डॉ. अनिल पाचणेकर, पास्कल सलढाणा व दत्तात्रय सावंत यांना करोना योद्धा पुरस्कार देण्यात आला. करोनाकाळात महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या घाटकोपर येथील ‘खाना चाहिए’ व ‘भजन समाज’ या संस्थांनाही राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.