मुंबई : जातीय सलोखा पाळण्याचा राज्याचा इतिहास असला तरी गेल्या अडीच ते तीन महिन्यांत राज्याच्या आठ शहरांमध्ये जातीय तणाव किंवा हिंसाचाराचे प्रकार घडले आहेत. गृह विभाग आणि गुप्तचर विभागाचे हे अपयशच मानावे लागेल. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांकडून जाणीवपूर्वक वातावरण तापविले जात अल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.

 राज्यात मार्चअखेरपासून जातीय तणावाचे प्रकार वाढीस लागले आहेत. रामनवमी उत्सवापासून ते आतापर्यंत संभाजीनगर, मुंबईतील मालाड मालवणी, अकोला नगरमध्ये शेवगाव आणि संगमनेर, जळगावमध्ये जातीय तणाव किंवा हिंसाचाराचे प्रकार घडले आहेत. कोल्हापूरमध्ये लवकरच जातीय दंगल होईल, असा इशारा माजी गृहराज्यमंत्री तथा काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांनी दोन आठवडय़ांपूर्वी दिला दिला होता. पाटील यांनी व्यक्त केलेली भीती खरी ठरली आहे. 

Latest News on Mamata Banerjee
पश्चिम बंगालमधील शालेय कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द; उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्य सरकारला धक्का
Rajasthan Loksabha Election 2024 Left candidate BJP takes donations from beef selling company
गोमांस विकणाऱ्या कंपन्यांकडूनच भाजपाला देणग्या; राजस्थानमधील एकमेव डाव्या उमेदवाराचा आरोप
Government decision not to increase read reckoner for elections
रेडीरेकनर वाढीला निवडणुकीची वेसण; घरांच्या किमती घटणार? रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीवर काय परिणाम?
mahayuti and maha vikas aghadi face problem with alliance partner over seat sharing issue
विश्लेषण : राज्यात दोन्ही आघाड्यांची कोंडी का होत्येय? विधानसभेच्या गणितांमुळे लोकसभेच्या जागावाटपात अडचण? 

अकोला आणि संभाजीनगरमधील हिंसाचारात दोघांचा मृत्यू झाला. यापैकी संभाजीनगरमध्ये पोलीस गोळीबारात एकाचा मृत्यू झाला. एवढय़ा अल्पकाळात राज्यातील जातीय वातावरण एवढे दुषीत कसे झाले, असा सवाल केला जात आहे. गृह विभाग किंवा गुप्तचर विभागाचे हे अपयशच मानावे लागेल. मुख्यमंत्रीपदी असताना गृह खाते हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होते व तेव्हा त्यांनी गृह खाते सक्षमपणे हाताळले होते. सध्या फडणवीस यांच्याकडे असलेले गृह खाते कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरू लागले की काय, असे चित्र निर्माण झाले आहे. कोल्हापूरमध्ये मंगळवारीच बंद आणि मोर्चाची हाक देण्यात आली होती. तरीही बुधवारी मोठय़ा प्रमाणावर जमाव जमा झाला. पोलिसांनी हा जमाव रोखला का नाही, असाही सवाल उपस्थित होत आहे.

नामांतराचे कारण?

औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नामांतर करण्याचा निर्णय झाला तेव्हापासूनच राज्यातील वातावरण बिघडू लागल्याचे निरीक्षण गृह विभागाच्या अधिकाऱ्यांनी नोंदविले आहे. रामनवमीच्या वेळी संभाजीनगर आणि मालाड मालवणीमधील मिरवणुकीवर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित कट होता, असेही सांगण्यात येते.

कोणत्या शहरात कधी संघर्ष झाला? 

’  छत्रपती संभाजी नगर- (रामनवमी – ३१ मार्च )

रामनवमी मिरवणुकीवर दगडफेक. पोलीस गोळीबारात एक जण ठार, ७६ जण अद्यापही अटकेत. यापैकी नऊ जण अल्पवयीन

’  मुंबई – मालाड मालवणी- (रामनवमी – ३१ मार्च)

रामनवमी मिरवणुकीच्या वेळी मोठय़ाने ध्वनिक्षेपक लावण्यावरून वाद.  ३०० जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

’  जळगाव- पालधी – (रामनवमी – ३१ मार्च)- प्रार्थनास्थळासमोर मोठय़ाने ध्वनिक्षेपक लावण्यावरून वाद.  ४५ जणांना अटक

’  अकोला (१३ मे)

समाज माध्यमातील पोस्टवरून दंगल. १ ठार, १० जखमी, १०० पेक्षा अधिक जणांना अटक

’  नगर -शेवगाव (१४ मे)

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीवरून वाद. ३० जणांना अटक तर १५० जणांच्या विरोधात गुन्हा दाखल ’  त्र्यंबकेश्वर (१४ मे)

मंदिरासमोर संदल प्रथेवरून वाद. ४ जणांना अटक. विशेष चौकशी पथकाकडून चौकशीचा आदेश ’  संगमनेर  (६ जून)

– लव्ह जिहादच्या विरोधात निघालेला मोर्चा संपताच समनापूर गावात दगडफेक ’  कोल्हापूर (७ जून)

समाज माध्यमातील आक्षेपार्ह छायाचित्रांवरून गोंधळ, पोलिसांकडून बळाचा वापर गेल्या सहा महिन्यांमध्ये राज्याच्या विविध भागांमध्ये हिंदू-मुस्लीम संघर्षांचे छोटोमोठे प्रकार घडत आहेत. यामागे कोणाची फूस असावी हे वेगळे सांगण्याची गरज नाही. आगामी निवडणुका लक्षात घेता सत्ताधारी पक्षाकडूनच वातावरण कलुषित केले जात आहे. गृह खाते आणि गुप्तचर विभागाचे हे अपयशच आहे.  – सतेज पाटील, माजी गृहराज्यमंत्री आणि काँग्रेस नेते