विरोधकांचे आव्हान नसल्यास काँग्रेस-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांचे पाय खेचतात, पण जेव्हा विरोधकांचे आव्हान उभे ठाकते तेव्हा मात्र उभयतांमध्ये चांगला समन्वय असतो, असा अनुभव मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी सांगितला.
राज्यातील ४८ पैकी चार-पाच मतदारसंघांतील अपवाद वगळता काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये योग्य समन्वय होता. गेल्या १५ वर्षांंत उभयतांमध्ये एवढा चांगला समन्वय पहिल्यांदा बघायला मिळाला, असे चव्हाण यांनी सांगितले. राज्यात आघाडीच्या किती जागा निवडून येतील याबाबत ठोस उत्तर देण्याचे टाळत गत वर्षांच्या तुलनेत जास्त जागा निवडून येतील, असा दावा केला.