मुंबई : घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेत आतापर्यंत १८ लोकांचे बळी गेले आहेत, त्यांच्या कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अजून काही लोक अडकलेले आहेत. मदतकार्य सुरू आहे, रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत, अशा दु:खद व वेदनामय परिस्थितीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा त्याच भागात रोड शो आयोजित केला जातो, सत्तापिपासू भाजपची संवेदनशीलता संपलेली आहे, अशा कठोर शब्दांत विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली.

महाराष्ट्रात पाचव्या व शेवटच्या टप्प्यात २० मे रोजी मतदान होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी भाजप व मित्रपक्षांच्या उमेदवारांसाठी नाशिक व कल्याण येथे जाहीर सभा घेतल्या. त्यानंतर सायंकाळी त्यांचा घाटकोपरमध्ये येथे रोड शो पार पडला. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात घाटकोपरचा भाग येतो. याच भागातील पेट्रोलपंपावर महाकाय होर्डिंग कोसळून त्यात १८ जण मृत्युमुखी पडले, अनेक जण जखमी झाले. त्याच वेळी मोदी यांचा घाटकोपर येथे रोड शो आयोजित करण्यात आला. यावरून व़ेडेट्टीवार यांनी मोदी व भाजपवर जोरदार टीका केली.

Ghatkopar incident
VIDEO : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मृतांची संख्या वाढली, बचावकार्यात अडचणींचा डोंगर!
dcm ajit pawar not reachable since after baramati constituency polling
अजित पवार कुठे आहेत?
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Ghatkopar stampeded Sitaution
नरेंद्र मोदींच्या रोड शोमुळे घाटकोपर रेल्वे स्थानकात चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती, संतप्त चाकरमन्यांकडून VIDEO पोस्ट
pm modi on prajwal revanna sex tape row
प्रज्वल रेवण्णा प्रकरणावर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं भाष्य; म्हणाले…
uddhav thackeray viral video
शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना बाहेर जायला सांगितलं, ठाकरेंनी हात जोडले अन्..; भाजपाने शेअर केला ‘तो’ VIDEO
devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?
Ghatkopar incident
Hording Collapse : घाटकोपर दुर्घटनेत मृतांची संख्या वाढली, महाकाय होर्डिंग उचलण्याचे काम सुरूच; VIDEO समोर!

हेही वाचा >>> अजित पवार कुठे आहेत?

मुंबईमध्ये होर्डिंग दुर्घटना घडली आहे. भ्रष्ट महायुतीमुळे या दुर्घटनेत १८ जणांना जीव गमवावा लागला. तरीदेखील भाजपचा रोड शो थांबला नाही. राज्यात मोदींची आतापर्यंत १७ वी प्रचारसभा पार पडली. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही एखादा नेता एवढ्या सभा घेत नाही, तेवढ्या सभा या राज्यात मोदी घेत आहेत. याचा अर्थ राहुल गांधी यांची मोदींना भीती वाटते, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

मोदी असंवेदनशील संजय राऊत

घाटकोपरमधील दुर्घटनेत आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेला जबाबदार असलेल्यांवर कारवाई तर झालीच पाहिजे पण या दुर्घटनेत १८ मुंबईकरांचा मृत्यू झालेला असताना त्याच मार्गावर पंतप्रधान नरेंद्र मोदी रोड शो करीत आहेत. यावरून मोदी किती असंवेदनशील आहेत हे लक्षात येत आहे. मोदी यांना मुंबईकर धडा शिकवतील असा घणाघात शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला. मोदींनी ज्या ज्या ठिकाणी सभा, रोड शो घेतले आहेत त्या मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार पडणार, असे भाकीत राऊत यांनी केले.