CoronaVirus Outbreak : करोना व्हायरसच्या तडाख्यामुळे सध्या जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. डॉक्टर आणि रूग्णालयातील इतर सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे जवळपास लाखभर लोक करोनातून पूर्णपणे बरे झाले असल्याची माहिती आहे. तशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठवड्याभरातच दुसऱ्यांदा देशाला संबोधित करत मंगळवारी अखेर संपूर्ण लॉकडाउनची घोषणा केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“करोनाशी लढण्यासाठी उभारा घरी राहण्याच्या दृढ संकल्पाची गुढी”

योग्य ती काळजी आणि उपचार घेतल्यास हा आजार बरा होऊ शकतो, यावर साऱ्यांचा विश्वास असून भारतातही याबाबत जनजागृती केली जात आहे. पण अनेकदा विनंती करूनही भारतीयांनी घरात राहणे पसंत केले नाही. त्यामुळे अखेर करोनावर मात करण्यासाठी शेवटचा उपाय म्हणून पंतप्रधान मोदी यांनी बुधवारपासून देशभरात लॉकडाउन जाहीर केला. या घोषणेनंतर साऱ्यांची किराणा माल आणि इतर जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी झुंबड उडाली. पुढील २१ दिवस ही दुकानेदेखील बंद राहतील की काय याची भिती साऱ्यांना असल्याने प्रत्येकानेच अन्नधान्याच्या दुकानांकडे धाव घेतली. अखेर, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांना ही सारी दुकाने २१ दिवसांच्या काळात सुरू राहतील असे स्पष्टीकरण द्यावे लागले.

CoronaVirus : लॉकडाउनच्या निर्णयाचे विराटकडून समर्थन; हरभजननेही दिला महत्त्वाचा सल्ला


अन्नधान्य व इतर दैनंदिन गरजेच्या वस्तूंची विक्री करणारे बिग बझार व्यवस्थापन यांनी २१ दिवसांच्या या लॉकडाउन कालावधीसाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसरातील ग्राहकांसाठी बिग बझार लॉकडाउन काळात घरपोच अन्नधान्य व इतर गरजेच्या सामनाची डिलिव्हरी करणार आहे. आपल्या जवळच्या बिग बझार दुकानात फोन करा.. तुमची सामानाची यादी द्या आणि घरी सामान आलं की पैसे द्या.. अशा आशयाचे ट्विट बिग बझारकडून करण्यात आले आहे. तसेच, विभागनिहाय त्या त्या भागातील दुरध्वनी क्रमांकदेखील देण्यात आले आहेत. मात्र मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याने सामान घरी येण्यास उशीर लागण्याची शक्यता असल्याचेही व्यवस्थापनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, छोटे दुकानदार देखील या कसोटीच्या काळात ग्राहकांच्या सोयीसाठी घरपोच सामान पोहोचवण्याचे काम करताना दिसत आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus big bazaar home delivery at doorsteps services to remain open during 21 day lockdown period vjb
First published on: 25-03-2020 at 16:57 IST