शिवेसना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी सक्तवसुली संचलनालयाचं (ईडी) पथक आज (मंगळवार) सकाळी दाखल झालं. तसेच, प्रताप सरनाईक यांच्या घरी तसंच कार्यालयांमध्ये ईडीचं पथकाने शोधमोहिम सुरु केली. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने तीव्र नाराजी व्यक्त करत भाजपावर निशाणा साधला आहे. मात्र असे असताना दुसरीकडे महाविकासआघाडी सरकारमधील शिवसेनाच सहकारी मित्र असलेल्या काँग्रेस पक्षाचे नेते संजय निरुपम यांनी शिवसेना नेत्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत.

“एक महिला घरी नसताना…सर्व फौजफाटा घेऊन तिचं ऑफिस उद्ध्वस्त केलं, यात कोणती मर्दानगी होती?”

“हे देखील एक फार मोठं सत्य आहे की, शिवसेना नेत्यांनी मागील काही वर्षांमध्ये एवढा भ्रष्टाचार केला आहे, एवढी अवैध संपत्ती जमा केलेली आहे. कुठ ना कुठं कोणी ना कुणी त्याचा तपास करेलच. मला नाही माहित आज ठाण्यातील ज्या आमदाराच्या घरी आज ईडीचा छापा पडला आहे, त्यांनी काय काय केलं आहे. हे तर चौकशीनंतरच समोर येईल. मात्र त्यांच्यासारखे असे खूप लोकं आहेत, ज्यांनी मोठ्याप्रमाणावर भ्रष्टाचार केला आहे. शिवसेनेचे जे मोठे नेते आहेत, त्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे. या चौकशीच्या प्रक्रियेस एक राजकीय द्वेष म्हणून टाळलं गेलं नाही पाहिजे.” असं संजय निरुपम यांनी म्हटलं आहे.” एबीपी माझाने या संदर्भात वृत्त दिलं आहे.

…हा निर्णय हेडलाइन बनवण्यासाठी आहे की काही प्रशासकीय धोरणही आहे? – संजय निरुपम

दरम्यान, या अगोदर देखील संजय निरुपम यांनी राज्यातील धार्मिकस्थळ पाडव्यापासून सुरू करण्याच्या निर्णयावरून राज्य सरकारवर निशाणा साधला होता.

“प्रताप धार्मिकस्थळं उघडण्याचा निर्णय मान्य आहे. मात्र काल-परवा मुख्यमंत्र्यांनी जोर देऊन म्हटलं होतं की दिवाळीनंतर करोनाची नवी लाट येईल आणि आज हा निर्णय? आश्चर्यकारक वाटत नाही का? हा निर्णय हेडलाइन बनवण्यासाठी आहे की काही प्रशासकीय धोरण देखील आहे?” असं त्यांनी म्हटलं आहे.