महापौर संजय मोरे यांच्या ठाणे महापालिकेतील कार्यालयाबाहेर ‘बिअर आंदोलन’ करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या सुटकेसाठी आग्रह धरत सोमवारी रात्री ठाणेनगर पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या आंदोलन करणारे कॉग्रेस आणि राष्ट्रवादी कॉग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह सुमारे २०० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे आंदोलन करण्यात अग्रभागी असलेले राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, कॉग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष बाळकृष्ण पुर्णेकर यांच्यासह ऊभय पक्षातील नगरसेवकांचा यामध्ये समावेश आहे.
ठाणे महापालिकेत बार मालकांची ‘असाधारण’सभा भरवून वाद ओढवून घेणाऱ्या सत्ताधारी शिवसेनेवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी महापौर संजय मोरे यांच्या कार्यालयाबाहेर बिअरने भरलेले टिन आणले होते. यावेळी काही ऊत्साही कार्यकर्त्यांनी दालनाबाहेर बिअरचा शिडकाव केल्याने शिवसेना आणि कॉग्रेस आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये सोमवारी जुंपल्याचे चित्र होते.
याप्रकरणी महापौर मोरे यांच्यासह महापालिका प्रशासनाने नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
संग्रहित लेख, दिनांक 7th Jan 2015 रोजी प्रकाशित
जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल
महापौर संजय मोरे यांच्या ठाणे महापालिकेतील कार्यालयाबाहेर ‘बिअर आंदोलन’ करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या सुटकेसाठी आग्रह धरत सोमवारी रात्री
First published on: 07-01-2015 at 02:14 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crime case filed against jitendra awhad