लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबई : चाकूचा धाक दाखवून मोबाइलमधून कूट चलन हस्तांतरित करण्यात आल्याचा प्रकार जोगेश्वरी येथे घडला. याप्रकरणी अंबोली पोलिसांनी नऊ जणांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार मुस्तफा शेख (३१) मालाड येथील रहिवासी आहेत.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
शेख यांना यूएसटीटी हे कूट चलन खरेदी करण्यासाठी बोलावले होते. त्यावेळी तेथे उपस्थित १५ ते २० जणांनी तक्रारदाराकडे पैशांची मागणी केली. पैसे दिले नाही म्हणून तक्रारदाराला लाथाबुक्क्याने मारहाण करण्यात आली. त्यानंतर तक्रारदाराचा मोबाइल काढून घेण्यात आला. त्यांच्या मोबाइलद्वारे आरोपींनी ६०० यूएसडीटी (२० हजार रुपये किंमत) हस्तांतरित केले. याप्रकरणी शेख यांच्या तक्रारीवरून अंबोली पोलिसांनी नऊ जणांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.