मुंबई : सीमाशुल्क विभागाने मुंबई विमानतळावर केलेल्या दोन भिन्न कारवायांध्ये ९६१० ग्रॅम सोन्यासह चौघांना अटक केली. त्यात केनिया देशाच्या रहिवाशी असलेल्या तीन महिलांचा समावेश आहे. दोन्ही कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत सुमारे पाच कोटी ८५ लाख रुपये आहे.

पहिल्या कारवाईत दुबईहून मुंबई विमानतळावर आलेल्या अमित जैन या रहिवाशाला सीमाशुल्क विभागाने थांबवले. तपासणीत त्याच्याकडे सोन्याचे ४४ लगड सापडले. आरोपीकडून एकूण ५१२७ ग्रॅम वजनाचे सोने जप्त करण्यात आले असून त्याची किंमत तीन कोटी २४ लाख ७७ हजार रुपये आहे. याप्रकरणी जैनाला सीमाशुल्क विभागाने अटक केली.

हेही वाचा…अल्पसंख्यांक याच मातीतील जीडीपीमध्ये त्यांचा वाटा मोलाचा, अनिल देसाई यांचे मत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसऱ्या कारवाईत केनिया येथून आलेल्या तीन महिलांना विमानतळावर थांबवण्यात आले. समीरा अबिदी (३७), फैजा हसन (२५) व फरदोसा अबिदी अशी या महिलांची नावे आहेत. त्यांच्याकडून ३३ सोन्याच्या लगड जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून एकूण ४ किलो ४८३ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे. आरोपी महिलांना याप्रकरणी अटक करण्यात आली.