मुंबई: शहरात सायबर गुन्ह्यांमध्ये प्रचंड वाढ झाली असताना दोन वर्षांनंतर मुंबई सायबर विभागाला पूर्णवेळ उपायुक्त मिळाला आहे. पुरुषोत्तम कऱ्हाड यांची सायबर उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे. यापूर्वी गुन्हे प्रकटीकरण विभागाचे दत्ता नलावडे यांच्याकडे सायबर विभागाचा अतिरिक्त कार्यभार होता.

मुंबईत १३ उपायुक्तांचे खांदेपालट करण्यात आले आहेत. याशिवाय मुंबईत नुकतीच बदली झालेल्या तीन उपायुक्तांना नवीन ठिकाणी नियुक्ती देण्यात आली आहे. गुन्हे प्रकटीकरण उपायुक्तपदी राजतिलक रोशन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दोन वर्षांपासून मुंबईतील सायबर विभागाला पूर्णवेळ उपायुक्त नव्हता. मुंबईत २०२३ पर्यंत केवळ २६२ कोटी रुपयांची सायबर फसवणूक झाली होती. त्यात २०२४ मध्ये वाढ होऊन सायबर फसवणुकीची रक्कम १२०० कोटी रुपयांच्या घरात पोहोचली. याच कालावधीत २०२३ मध्ये या हेल्पलाइनला सुमारे ९१ हजार दूरध्वनी आले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात १० लाखांहून सायबर हल्ले झाले होते. दोन वर्षांनी आता मुंबईच्या सायबर विभागाला पूर्णवेळ उपायुक्त मिळाला असून, पुरुषोत्तम कऱ्हाड यांची तेथे बदली करण्यात आली आहे. पोलीस आस्थापना मंडळाची गुरुवारी बैठक झाली. त्यानंतर या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले.