अरबी समुद्रात तयार झालेल्या तौते चक्रीवादळ महाराष्ट्राच्या  दिशेने सरकत आहे. तौते चक्रीवादळाने रविवारी मालवण तालुक्याच्या किनारपट्टीवर तडाखा देण्यास सुरुवात केली असून, पहाटे पासून सुरू झालेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे. रविवारी सकाळी तौते चक्रीवादळाने तीव्र स्वरुप धारण केले असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) सांगितले. १८ मे रोजी पहाटेच्या सुमारास चक्रीवादळ पोरबंदर आणि महुवा (भावनगर जिल्हा) दरम्यान गुजरात किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. सध्या हे वादळ पणजी-गोव्याच्या नैऋत्य दिशेला सुमारे १५० कि.मी., मुंबईपासून ४९० कि.मी. दक्षिणेस आणि वेरावळ (गुजरात) च्या दक्षिण- नैऋत्येकडे ७३० कि.मी. वर आहे.

तौते चक्रीवादळामुळे सोमवारी मुंबईत जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आयएमडीने व्यक्त केली आहे. मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट आणि रायगड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे अशी माहिती आयएमडीने दिली आहे.

Imd issued heatwave warning in mumbai on sunday and monday
मुंबईत रविवार, सोमवार उष्णतेच्या लाटेचा इशारा; ठाण्यासह पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांनाही इशारा
dhule crime news, dhule gutkha transport marathi news,
साड्यांच्या गठ्ठ्यांआडून गुटख्याची वाहतूक, धुळे जिल्ह्यात साडेदहा लाखाचा मुद्देमाल जप्त
Smuggling liquor, Delhi to Mumbai, State Excise Department, Seizes 205 Bottles, Foreign Liquor, Arrests one man, crime, marathi news,
दिल्लीवरून मुंबईत मद्याची तस्करी
Smuggling liquor, Delhi to Mumbai, State Excise Department, Seizes 205 Bottles, Foreign Liquor, Arrests one man, crime, marathi news,
दिल्लीवरून मुंबईत मद्याची तस्करी

या पार्श्वभूमीवर मुंबईतील लसीकरण मोहिम सोमवारी देखील रद्द करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेने शहरातील कोविड केअर सेंटरमधील ५८० रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयांमध्ये हलवले आहे. पालिकेने शनिवारी रात्री बीकेसी (२४३), दहिसर (१८३) आणि मुलुंड (१५४) जंबो कोविड सेवेच्या सुविधा असलेल्या या कोविड सेंटरमधून ५८० रुग्णांना मुंबईतील इतर रुग्णालयात हलवले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याला तौते चक्रीवादळाचा सकाळी मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यात धडक दिल्यानंतर मालवण तालुक्याच्या किनारपट्टीवर वादळाने तडाखा देण्यास सुरुवात केली. अनेक ठिकाणी झाडे कोसळली आहेत.

दरम्यान, कर्नाटक राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या माहितीप्रमाणे तौते चक्रीवादळामुळे चार मृत्यू झाला आहे. चार नागरिकांना प्राण गमवावे लागले असून, ७३ गावांमध्ये चक्रीवादळामुळे नुकसान झालं आहे. चक्रीवादळामुळे कर्नाटकातील सहा जिल्ह्यांत मुसळधार पाऊस झाला.