विक्रोळीतील पार्कसाईट येथे एका घरात सिलेंडरचा स्फोट होऊन ५ ते ६ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. पार्कसाईट परिसरातील वर्षानगर भागातील एका चाळीत आज सकाळी ही घटना घडली. या घटनेतील जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
जखमींमध्ये दोन महिला, दोन पुरुष आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताचं अग्निशमन दलाच्या अधिका-यांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. कुर्ल्यातील सिटीकिनारा रेस्टॉरंटमध्ये सिलेंडरचा स्फोट होऊन ८ जण ठार झाल्याच्या दुर्दैवी घटनेला अवघे २४ तासही उलटत नाहीत तोच ही दुसरी घटना आज घडली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 17th Oct 2015 रोजी प्रकाशित
विक्रोळीत घरात सिलेंडर स्फोट; ६ जण जखमी
विक्रोळीतील पार्कसाईट येथे एका घरात सिलेंडरचा स्फोट होऊन ५ ते ६ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.
Written by चैताली गुरवguravchaitali
Updated:
First published on: 17-10-2015 at 13:03 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cylender blast at vikroli parksite six injured