मुंबई / Mumbai Dahi Handi 2025 Celebration : मालाडमध्ये एका चाळीमध्ये बांधलेली दहीहंडी फोडताना थरावरून पडून नऊ वर्षांचा बाल गोविंदा जखमी झाला. त्याला कांदिवलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महानगरपालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर आहे.

मुंबईमध्ये दहीहंडी फोडताना दुपारी ३ वाजेपर्यंत जवळपास ३० जण जखमी झाले होते. मालाडमधील कुरार गावातील तानाजी नगर या चाळीमध्ये शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता बाल गोविंदांसाठी दहीहंडी बांधली होती.

ही दहीहंडी फाेडताना आर्यन यादव (९) हा बाल गोविंदा थरावरून खाली पडून जखमी झाला. त्याला तातडीने कांदिवलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महानगरपालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रुग्णालयातील डॉक्टरनी दिली.