‘आगीत आमचे सर्व काही भस्मसात झाले आहे. त्यातून आम्ही अद्याप सावरलेलोही नाही. अशा वेळी राज्य शासन अवघ्या ३ हजार ८०० रुपयांची मदत करुन आमची चेष्टा करताय का? असा जळजळीत सवाल दामूनगर मधील रहिवाशांनी बुधवारी पोलिसांना केला आणि पोलीसही निरुत्तर झाले. राज्य शासनाकडून दामूनगर मधील रहिवाशांना मदत म्हणून प्रत्येकी ३ हजार ८०० रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे. रहिवाशांना ते धनादेश सुपूर्द करण्यासाठी पोलीस दामुनगरात गेले होते. तातडीने प्रत्येकी किमान १० हजार रुपयांची आर्थिक मदत केली जावी, अशी अपेक्षा रहिवाशांची आहे.
संग्रहित लेख, दिनांक 10th Dec 2015 रोजी प्रकाशित
दामूनगर आगग्रस्तांनी तुटपुंजी मदत नाकारली
‘आगीत आमचे सर्व काही भस्मसात झाले आहे.
Written by रत्नाकर पवार
Updated:
First published on: 10-12-2015 at 00:27 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Damu nagar peoples not ready to take minor help