मुंबई : मुंबईत करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत झालेल्यांच्या संख्येत सुमारे २०० टक्के म्हणजेच तिपटीने वाढ झाली. करोना काळात कर्करोगासह हृदयविकार, क्षयरोगामुळे मृत्यू झाल्याचे प्रमाण घटले होते. २०२१ मध्ये मात्र हे प्रमाण पुन्हा वाढल्याचे आढळले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईत सर्वाधिक म्हणजे सुमारे १२ टक्के मृत्यू हे कर्करोगाने होतात. त्या खालोखाल हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण १० टक्के तर क्षयरोगामुळे सुमारे सहा टक्के असते. करोनाची साथ सुरू झाली त्यावर्षी, २०२० मध्ये मात्र कर्करोगासह हृदयविकार, क्षयरोगामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे आढळले होते. २०२१ मध्ये मात्र यात पुन्हा वाढ झाल्याचे आरटीआय कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी माहिती अधिकारांतर्गत मागविलेल्या माहितीमधून निदर्शनास आले आहे. मुंबईत २०१८ मध्ये हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ८ हजार ६०१ होती. २०१९ मध्ये यात घट होऊन ५ हजार ८४९ झाली. करोनाच्या पहिल्या लाटेमध्ये म्हणजेच २०२० मध्ये आणखी घट होऊन ५ हजार ६३३ मृत्यू नोंदले गेले. करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या काळात जानेवारी ते जून २०२१ या सहा महिन्यांच्या काळातच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्यांच्या संख्येत तिपटीहून अधिक वाढ झाली आहे. या काळात १७,८८० रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deaths from heart attack tripled during corona second wave zws
First published on: 21-06-2022 at 03:59 IST