कल्याण-डोंबिवलीतील रुग्णसंख्येत घट

दिवसभरात मुंबईपेक्षा पुण्यात जास्त रुग्ण

प्रतिकात्मक छायाचित्र

राज्यात गेल्या २४ तासांत मुंबईपेक्षा पुण्यात जास्त रुग्ण आढळले. कल्याण-डोंबिवलीतील रुग्ण संख्या आठवडाभराने घटली आहे. राज्यात मंगळवारी करोनाच्या ६,७४१ रुग्णांची नोंद झाली.

पुणे शहरात दिवसभरात ११३९  तर मुंबईत ९६९ रुग्ण आढळले. गेले दोन महिने मुंबईतील रुग्णांची संख्या अधिक होती. मुंबईपेक्षा आता पुण्यातील रुग्ण संख्या वाढली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये ५४१ रुग्ण आढळले आहेत. ठाणे जिल्ह्य़ातील सर्वच महानगरांमधील रुग्णसंख्या गेल्या दोन आठवडय़ांच्या तुलनेत घटली आहे.

राज्यातील एकू ण रुग्णसंख्या ही २ लाख ६७ हजार झाली असून, यापैकी ९५ हजार रुग्ण हे मुंबईतील आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Decrease in the number of patients in kalyan dombivali abn

ताज्या बातम्या